भारताचा जावई पुन्हा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी

वृत्तसेवा
Friday, 13 December 2019

  • ब्रिटनमध्ये पुन्हा "जॉन्सन'राज
  • कंटाळलेल्या जनतेचा ब्रेक्‍झिटला स्पष्ट कौल

लंडन : गेली तीन वर्षे "निवडणूक मोड'वर असलेल्या ब्रिटनवासीयांनी नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाला स्पष्ट बहुमत दिले. या सुस्पष्ट विजयामुळे जॉन्सन यांचा "ब्रेक्‍झिट'ची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जॉन्सन यांनी आपलं भारताशी विशेष नातं असल्याचं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगतलं आहे. आपण भारताचे जावई असल्याचा प्रचार त्यांनी केला होता. अर्थातच त्यांच्या विजयात ब्रिटनस्थित मूळच्या भारतीय वंशाच्या नागरिकांची मोठी भूमिका असल्याचं मानलं जात आहे.

अविवाहित जोडप्याने हॉटेलात एकत्र राहणे गुन्हा नाही 

ब्रिटनच्या लोकप्रतिनिधिगृहातील 650 जागांपैकी हुजूर पक्षाला 364 जागा मिळाल्या. बहुमताला आवश्‍यक असलेल्या जागांपेक्षा ही संख्या 78ने अधिक आहे. जॉन्सन (वय 55) यांनी प्रचार मोहिमेत "ब्रेक्‍झिट प्रक्रिया पूर्ण करूच' हीच एकमेव घोषणा दिली होती आणि यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले होते. जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत दिल्याने ब्रेक्‍झिट विरोधकांचीही तोंडे बंद झाली आहेत. कारण, याच मुद्द्यावर 2016मध्ये सार्वमत घेऊनही अनेकदा संसदेत सरकारला माघार घ्यावी लागली आहे. आता मात्र सर्व अडथळे दूर झाले असून 31 जानेवारी या नव्या कालमर्यादेत ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण होणे दृष्टिपथात आले आहे. जॉन्सन हे लंडनमधील अक्‍सब्रिज अँड साऊथ रुइस्लीप मतदारसंघातून निवडून आले. प्रमुख विरोधी मजूर पक्षाला या निवडणुकीत केवळ 203 जागा मिळाल्या.

एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर... : बाळासाहेब थोरात 

ब्रिटनमध्ये काल (ता. 12) झालेल्या निवडणुकीत तब्बल 67 टक्के नागरिकांनी मतदान केले होते. गेल्या अनेक वर्षांत इतके मतदान झाले नव्हते. यावरूनच, ब्रेक्‍झिटवरून निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेला नागरिक किती कंटाळले होते, ते स्पष्ट होते. जॉन्सन हे आता लवकरच बकिंगहॅम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेऊन सरकारच्या कामकाजास सुरवात करतील. जॉन्सन यांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगातील विविध नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

ब्रेक्‍झिटवर गेली तीन वर्षे सुरू असलेला सावळागोंधळ आता मी दूर करेन आणि ही प्रक्रिया 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करेन. यात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. - बोरीस जॉन्सन, पंतप्रधान, ब्रिटन

CAB : जपानी पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याला ब्रेक; आंदोलनाचा फटका

चर्चेस तयार : युरोपीय महासंघ
ब्रुसेल्स : पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे पंतप्रधानपदावर कायम राहिल्याने ब्रिटनचा युरोपीय महासंघातून (ईयू) बाहेर पडण्याचा मार्ग निर्धोक झाला आहे, त्यामुळे ब्रेक्‍झिट चर्चेच्या पुढील टप्प्यासाठी आम्ही तयार आहोत, असे "ईयू'ने आज जाहीर केले आहे. आमच्यात आता अधिक गंभीरपणे चर्चा होऊन ठरविलेल्या गोष्टी पूर्ण करता येतील, असा विश्‍वास "ईयू'चे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boris Johnson hails 'new dawn' after historic victory