एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर... : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

भाजपनेते एकनाथ खडसे हे आमचे मित्र आहेत ते आमच्यासोबत आले तर पक्षवाढीसाठी नक्कीच मदत होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीला प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये अनेक नेते नाराज असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

मुंबई : भाजपनेते एकनाथ खडसे हे आमचे मित्र आहेत ते आमच्यासोबत आले तर पक्षवाढीसाठी नक्कीच मदत होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीला प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये अनेक नेते नाराज असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, 'नागपूर, वाशीम, नंदुरबार, धुळे, अकोला जिल्हापरिषद निवडणुकीत काँग्रेस जोमाने काम करणार असून निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. या निवडणुका लढतांना आघाडीला अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. ज्या ठिकाणी क्षमता असेल तेथे शिवसेनाला सोबत घेऊन निवडणूका लढविल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

अविवाहित जोडप्याने हॉटेलात एकत्रित राहणे गुन्हा नाही

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे खातेवाटपाला थोडा उशीर झाला परंतु, सर्व प्रश्न खेळीमेळीने सुटले आहेत. अधिवेशनानंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat may Invite Eknath Khadse in Congress party