Total Filmy! चोरीनंतर रस्त्यावर उधळले पैसे; बँकांना लूटून चोर फरार

robbers money
robbers money

ब्राझील : पिक्चरमध्ये चोरी आणि तत्सम चित्तथरारक घटना पहायला लोकांना नेहमीच आवडतं. भारतात धूम पिक्चरच्या सिरीजने याचप्रकारे लोकांचं मनोरंजन केलं होतं. इतकंच काय, अलिकडेच मनी हेईस्ट नावाची आलेली वेब सिरीज तर याच धर्तीवर आधारित होती. मात्र, तुम्ही कधी हे प्रत्यक्षात घडेल, असा विचार केलाय का? नसेल केला तर आता करावा लागेल. कारण, ब्राझीलच्या एका शहरात चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने चोरी केल्याची घटना घडलीय. बँकेत बंदुकीचा धाक दाखवून पैसे लुटल्यानंतर या चोरट्यांनी रस्त्यावर नोट उडवले आहेत. अर्थातच असे पैसे उडवल्यानतंर ते मिळवण्यासाठी लोकांचा एकच कल्लोळ झाला आणि मग त्या कल्लोळात या चोरट्यांनी धुम ठोकली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात एका पोलिस कर्मचाऱ्यासहित दोन जण जखमी झाले आहेत. ग्लोबो टेलीव्हिजन नेटवर्कच्या सांगण्यानुसार, कमीतकमी 10 गाड्यांमध्ये 30 गुन्हेगार होते आणि त्यांनी पोलिसांसाठीचे रस्ते बंद केले होते. 

ब्राझीलच्या सिंगर-साँगरायटर जेल फ्लोरिजेलने ट्विटरवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये लोक नोटांसाठी धावपळ करताना दिसत आहेत. त्यांनी ट्विट केलंय की, ब्राझीलच्या क्रिशूमा शहरात मोठ्या चोरीनंतर जमीनीवर पडलेल्या नोटा उचलताना लोक. लोकांचा क्रिसमस चांगला होईल. 

हेही वाचा - मच्छीमाराला मिळाली व्हेल माशाची उलटी; रातोरात झाला कोट्यधीश
महापौर क्लेसियो सल्वारो यांनी ट्विटरवर लोकांना आवाहन केलंय की त्यांनी आपल्या घरीच रहावं. पोलिसांना आपलं काम करु द्यावं. त्यांनी म्हटलंय की शहराला निशाणा केला गेलाय. सैन्य प्रशासन आणि सुरक्षाबलांच्या समवेत परिस्थितीचे आकलन केलं जात आहे. शहरात जवळपास 3-4 जागी लूट झाली आहे. शहराच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com