esakal | दहा दिवसांपासून उचक्या थांबेनात; ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष रुग्णालयात
sakal

बोलून बातमी शोधा

दहा दिवसांपासून उचक्या थांबेनात; ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष रुग्णालयात

बोल्सोनारो यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यात ते एका बेडवर असल्याचं दिसतं.

दहा दिवसांपासून उचक्या थांबेनात; ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष रुग्णालयात

sakal_logo
By
सूरज यादव

ब्राझिलिया - ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो गेल्या दहा दिवसांपासून उचक्यांमुळे त्रस्त आहेत. अखेर उचक्या थांबत नसल्यानं बुधवारी बोल्सोनारो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, आतड्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यानं असा त्रास होत आहे. यासाठी सर्जरी करण्याची गरज पडू शकते. सध्या तरी लगेच सर्जरी करण्यात येणार नाही असं सांगण्यात आलं आहे.

राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आधी त्यांना ब्राझिलियामधील आर्म्ड फोर्सेस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिथं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. डॉक्टर त्यांच्या उचक्या थांबवण्यासाठी उपचार करत आहेत. मात्र काही तासांनी पुन्हा असं सांगण्यात आलं की, त्यांना साओ पाओलो रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.

हेही वाचा: ड्रगनला कोरोनाचा फटका, दुसऱ्या तिमाहीत GDP मध्ये घसरण

बोल्सोनारो यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यात ते एका बेडवर असल्याचं दिसतं. बोल्सोनारो यांच्यावर 2018 मध्ये झालेल्या हल्ल्यावेळी आतड्यांना इजा पोहोचली होती. तेव्हापासून आतापर्यंत अनेकवेळा सर्जरी झाली आहे. काही कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलण्यास त्रास होत असल्याचंही दिसून आलं आहे. 7 जुलै रोजी झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, मला ऐकणाऱ्यांची मी माफी मागतो. गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने उचक्या लागत आहेत.

हेही वाचा: 'खायला अन्न नाही, मदत करा'; हुकूमशहा किम जोंग उन झाले हतबल

उचक्या लागण्याचे कारण बोल्सोनारो यांच्यावर 2018 च्या निवडणूक प्रचारादरम्यान झालेला हल्ला आहे. त्यावेळी बोल्सोनारो यांच्या पोटावर वार झाले होते. तेव्हापासून बोल्सोनारो यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनेच त्यांना साओ पाओलोमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.

loading image