भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य, म्हणतात......

britain pm boris johnson said about india-china dispute
britain pm boris johnson said about india-china dispute

लंडन- भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणाव गंभीर आणि चिंताजनक असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच उभय देशांनी आपसातील चर्चेच्या माध्यमातून वाद सोडवावा, असं आवाहनही त्यांनी केले आहे. 

बोरिस जॉनसन यांनी दोन्ही देशांनी सामंजस्याने घेण्याचे आवाहन केले आहे. जॉनसन यांनी भारत आणि चीनमधील स्थितीवर आम्ही बारिक लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं आहे. हॉऊस ऑफ कॉमनमध्ये बुधवारी 'prime minister Question' या साप्ताहिक कार्यक्रमात जॉनसन यांनी या मुद्द्यावर पहिल्यांदाच आधिकारिक वक्तक्य केलं आहे.

WHO ने कोरोनाबाबत दिला आणखी एक इशारा; सांगितले...
आण्विक शक्ती असणाऱ्या दोन मोठ्या देशांमध्ये सुरु असलेल्या वादाविषयी बोरिस जॉनसन यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले आहेत की, 'दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला वाद गंभीर आणि चिंताजनक आहे. ब्रिटन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. शिवाय उभय देशांतील वाद सोडवण्यासाठी आम्ही चर्चेसाठी प्ररित करत आहोत'.

चीनची भारतातील गुंतवणूक टांगणीला
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील संबंध टोकाला गेले आहेत. भारताने चीनची कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. अनेक देशांनी भारत-चीन तणावावर भाष्य करत चीनच्या विस्तारवादी भूमिकेवर टीका केली आहे. अमेरिकेने उघडउघड चीनच्या विरोधात भूमिका घेतली असून चीनने आपल्या कुरापती थांबवाव्यात असे खडेबोल सुनावले आहेत. तर रशियाने भारत-चीन वादामध्ये पडण्यास नकार दिला आहे. दोन्ही देश आपले प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ असल्याचं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.

चीनच्या कुरापती सुरूच; आता या भागात वाढविले येथे सैन्य !
पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला वाद सोडवण्यासाठी भारत आणि चिनमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरु आहे. मात्र, दोन्ही देशांनी सीमा भागात सैन्याची जमवाजमव वाढवली आहे. तसेच युद्ध उपकरणांची आवकही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती स्फोटक बनली आहे. 6 मे रोजी चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. तेव्हापासून उभय देशातील सैन्य समोरासमोर आले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com