बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी ब्रिटनचा सर्वात मोठा निर्णय!

New Anti-Immigration Policy
New Anti-Immigration Policy

New Anti-Immigration Policy : ब्रिटनमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.  पंतप्रधान ऋषी सुनक यांना त्यांच्याच पक्षांनी घेरले आहे. त्यामुळे सुनक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  बेकायदेशीर स्थलांतरितांना देशात येण्यापासून रोखण्यासाठी सुनक सरकारने गुरुवारी नवीन कायदा आणला. नवीन कायद्यांनुसार ब्रिटन व्हिसा-पासपोर्टशिवाय सागरी मार्गाने बेकायदेशीरपणे येणाऱ्या स्थलांतरितांना रोखणार आहे.

स्थलांतरितांचे आगमन फायदेशीर आहे परंतु व्यवस्थेचा गैरवापर होऊ नये दूर करणे खूप महत्वाचे असल्याचे  पंतप्रधान सुनक यांनी म्हटले आहे. नवीन नियम आणि कडक उपायांवर त्यांनी भर दिला आहे.

नवीन नियमांनुसार ब्रिटनला जाणारे स्थलांतरित कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सोबत घेऊन जाऊ शकणार नाहीत. याशिवाय व्यवसायांना दिलेली 20 टक्के पगार सवलतही मिळणार नाही. गेल्या वर्षभरात सात लाखांहून अधिक लोक ब्रिटनमध्ये गेले आहेत. नवीन नियमांनुसार हे स्थलांतर तीन लाखांपर्यंत कमी करण्याचे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट आहे.

New Anti-Immigration Policy
Joe Biden : ज्यो बायडेन यांच्या पुत्राला होऊ शकते १७ वर्षांची शिक्षा; 'या' प्रकरणांमुळे अडचणींमध्ये वाढ

राष्ट्रीय हितासाठी कायदा आवश्यक-

बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यावर बोलताना ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले, "आज सरकारने आतापर्यंतचा सर्वात कठोर बेकायदेशीर इमिग्रेशन कायदा आणला आहे. मला माहित आहे की यामुळे काही लोकांची निराशा होईल. तुम्हाला याबद्दल खूप टीका ऐकायला मिळेल. मात्र अवैध स्थलांतरितांच्या प्रवेशावर बंदी घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

ते पुढे म्हणाले, "मी देखील स्थलांतरितांचा मुलगा आहे. लोक ब्रिटनमध्ये येतात कारण ब्रिटन हा एक अद्भुत देश आहे. ब्रिटन लोकांना संधी देते, आशा आणि सुरक्षा प्रदान करतो. पण फरक असा आहे की माझे कुटुंब येथे कायदेशीररित्या आले आहे. बहुतेक स्थलांतरितांप्रमाणे ते स्थानिक समुदायात समाकलित झाले." (New Anti-Immigration Policy )

New Anti-Immigration Policy
PM Modi : ग्लोबल लीडर मोदीच! लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थान कायम; मेलोनी कितव्या क्रमांकावर?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com