UK PM Election : भारतीय वंशाचे ऋषी सुनक मजबूत स्थितीत, तिसऱ्या फेरीत 115 मतांसह आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rishi sunak

भारतीय वंशाचे ऋषी सुनक मजबूत स्थितीत, तिसऱ्या फेरीत 115 मतांसह आघाडीवर

लंडन : ब्रिटनमधील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत असून, सोमवारी झालेल्या मतदानाच्या तिसऱ्या फेरीत ऋषी 115 मतांनी आघाडीवर राहिले आहेत. आज चौथ्या फेरीचे मतदान पार पडणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी एकूण 357 मते पडली. त्यात सुनक यांना तिसऱ्या फेरीत (Britain Third Round Voting) 115 मते मिळाली. दुसऱ्या फेरीपेक्षा या फेरीमध्ये 14 मते अधिक आहेत. त्यामुळे आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान असतील अशी चर्चा रंगू लागली आहे. (Rishi Sunak Latest News In Marathi)

हेही वाचा: CBSE बोर्ड टर्म 2 निकालाबाबत नवीन अपडेट जारी; जाणून घ्या, कधी लागणार Result

तिसऱ्या फेरीत ऋषी सुनक अधिक मजबूत

ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या दावेदारांच्या शर्यतीत तिसऱ्या फेरीतील आघाडीनंतर ऋषींनी ब्रिटनला अधिक मजबूत बनवण्याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आपण एकत्रितपणे आपली अर्थव्यवस्था पुन्हा उभारू शकतो. तसेच ब्रेक्झिट वाचवू शकतो असे म्हटले आहे. ऋषी सुनक यांच्याशिवाय कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे (Conservative Party) तीन उमेदवार पेनी मॉर्डेंट, लिझ ट्रस आणि केमी बॅडेनोक अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. तर, तिसऱ्या फेरीत कमी मते मिळाल्याने टॉम तुगेंधत हे शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

हेही वाचा: ऋषी सुनक यांची पत्नी इंग्लडच्या महाराणीपेक्षा श्रीमंत!

पंतप्रधानपदासाठी कोणत्या उमेदवाराला किती मते?

ब्रिटनमधील निवडणुकीच्या या फेरीत ऋषी सुनक यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डाउंट Penny Mordaunt) 82 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी लिझ ट्रस (Liz Truss) 71 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय कॅमी बडेनोच 58 मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. या फेरीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेले टॉम तुगेंधत यांना केवळ 31 मते मिळाली. पंतप्रधान पदासाठीच्या या शर्यतीत गुरुवारपर्यंत केवळ दोनच उमेदवार रिंगणात राहणार असून, ५ सप्टेंबरपर्यंत विजयी उमेदवार तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जागी नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. आतापर्यंतच्या मतांमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी आघाडी कायम ठेवल्याने या पदासाठी त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.

Web Title: Britain Politics Rishi Sunak Leads In Race To Become Uk Pm Gets 115 Votes In Third Round

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..