'चीनला जाऊ नका; अमेरिका आणि ब्रिटनचा नागरिकांना सल्ला

trump and jinping
trump and jinping

न्युयॉर्क- जगभरात कोरोनाने मोठा कहर केला आहे. ही कोरोनाची साथ जगातील जवळपास सर्व देशांत पसरत आहे. याचाच परिणाम म्हणजे जगाची अर्थव्यवस्था बिकट अवस्थेत आहे. पण कोरोनाची साथ ज्या चीनमधून (China) सुरु झाली आहे तो चीन आता कोरोनातून सावरला आहे. चीन सध्या जगातील बऱ्याच देशांशी नडतानाही दिसतोय. यामध्ये भारतासोबतचा सीमावाद (India-China Standoff), दक्षिण चीन समुद्रातील मुद्द्यावरून सतत उडणारे खटके तसेच हाँगकाँग आणि तैवानच्या (India-China Standoff) प्रश्नांचा सामावेश होतो.

मागील काही दिवसांपुर्वी अमेरिका आणि चीनमध्ये दक्षिण चीन समुद्रात केलेल्या शस्त्रात्रांच्या चाचणीवरून वाद विकोपाला गेला होता. आता अमेरिका आणि ब्रिटन यांनी चीनविरूद्ध एक ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी जारी केली असून नागरिकांना तेथे न जाण्याचा सल्लाही दिला आहे. दोन्ही देशांनी नागरिकांना सांगितले आहे की जर तुम्ही चीनला जाणार असाल तर तुम्हाला तिथं मनमानीपणे चिनी पोलिस अटक करु शकतात. 

 चीन सोबत बिघडत असलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी  ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी जारी केले आहे. येणाऱ्या काही दिवसांत आणखी बरेच देश या अमेरिका-ब्रिटनच्या कृतीचं अनुसरण करू शकतात, असं सांगितलं जात आहे.  दोन्ही देशांनी आपल्या नागरिकांना चीन आणि हाँगकाँगचा प्रवास शक्यतो न करण्याचा इशारा दिला आहे. अमेरिका आणि ब्रिटन यांनी आपल्या नागरिकांना सांगितले आहे की, ते चीन किंवा हाँगकाँगला गेले तर त्यांना कुठलही कारण नसताना ताब्यात घेतलं जाण्याचा आणि स्थानिक कायदे लावून शिक्षा करण्याचा धोका आहे.

 अमेरिका-चीनमध्ये वाढू शकतो-
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन आणि अमेरिका गेल्या अनेक महिन्यांपासून तणावग्रस्त परिस्थितीत होते. आता या ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरीमुळे तणाव जास्तच वाढेल असं मानलं जातंय. अलीकडेच अमेरिकेने चिनी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी व्हिसा नियम कडक केले आहेत. चीन सरकारच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने या वर्षाच्या जुलैमध्ये केवळ 145 चिनी विद्यार्थ्यांना व्हिसा दिला आहे. गेल्या वर्षी जुलैच्या तुलनेत हे केवळ ०.7 टक्के आकडा आहे.
 नव्या अ‍ॅडव्हायझरीत अमेरिकन नागरिकांना असा इशारा देण्यात आला आहे की चीन मनमानीपणे अमेरिकन नागरिकांना कैद करु शकतं. याशिवाय अमेरिका आणि ब्रिटनमधील लोकांनाही बाहेर जाण्यास बंदी घातली जाऊ शकते. 

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com