Justin Trudeau
Justin Trudeauesakal

Justin Trudeau तिसऱ्यांदा होणार कॅनडाचे पंतप्रधान

टोरंटो : कॅनडाच्या लोकसभा निवडणुकीत जस्टिन ट्रू़डोंच्या (Justin Trudeau) लिबरल पक्षानं प्रचंड मतांनी बाजी मारत विरोधकांचा सुपडासाफ केला आहे. त्यामुळे ट्रू़डो पुन्हा कॅनडाचे पंतप्रधान होणार हे आता जवळपास निश्चित मानलं जातंय. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांना मेल केलेल्या मतपत्रिकाही मोजाव्या लागतात. त्यातही ट्रू़डोंचा पक्षच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. कॅनडात पूर्ण बहुमतासाठी पक्षाने लोकसभेच्या 338 पैकी 170 जागा जिंकणं आवश्यक आहे. ट्रुडो यांच्या लिबरल पक्षानं या निवडणुकीत 156 जागा जिंकल्या, तर कंझर्वेटिव्ह पक्षानं 123 जागा जिंकल्या आहेत.

Summary

कॅनडात पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर (Canada General Election) प्राथमिक निकाल आता हाती येऊ लागलेत.

ट्रू़डो मुदतीच्या दोन वर्षे आधीच निवडणुका घेत आहेत. त्यांच्या पक्षाला आशा आहे, की कोरोना महामारीत निवडणुका घेतल्यास पक्षाला याचा चांगला फायदा होऊ शकतो. कोरोना काळात लिबरल पक्षानं उत्तम कामगिरी करत अनेकांचे प्राण वाचवले आहेत, त्यामुळे जनता आमच्यावर खूश होऊन आम्हाला पुन्हा संधी देईल, असा विश्वास ट्रू़डो यांनी व्यक्त केलाय. याआधी 2019 च्या फेडरल निवडणुकीत (federal election) पक्ष बहुमताच्या खूपच मागे राहिला होता. 49 वर्षाचे ट्रुडो 2015 पासून कॅनडाचे नेतृत्व करत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांना लोकांच्या विरोधाचाही सामना करावा लागलाय. मागील निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर, ट्रू़डोंच्या लिबरल पक्षाला 157 जागा जिंकता आल्या होत्या, तर कंझर्वेटिव्ह पक्षाने 121 जागा जिंकल्या होत्या. लिबरल पार्टी संसदेत जास्तीत-जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे, पण बहुमत मिळवण्याबाबत शंका उपस्थित होत आहेत. अशा स्थितीत विरोधी पक्षाच्या सहकार्याशिवाय विधेयक मंजूर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनाही जुळवून घ्यावं लागणार आहे.

Justin Trudeau
'आम्ही गांधीजींना सोडलं नाही, मग तुम्ही कोण?

कॅनडात भारतीयांना 'लाभ'

जस्टिन ट्रूडोंच्या सरकारचा भारतीयांना सर्वाधिक फायदा झालाय. ट्रुडो यांच्या पक्षानं एक्सप्रेस एंट्री कार्यक्रमांतर्गत (Express Entry program) 2015 मध्ये इमिग्रेशन धोरणाचा विस्तार केला. ज्यात 2019 मध्ये कॅनडानं 3.4 लाख लोकांना कायमस्वरूपी निवासस्थानाचा दर्जा दिला. या स्थलांतरितांमध्ये सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे. यात भारत 25 टक्के, चीन 9 टक्के आणि फिलिपिन्सच्या 8 टक्के लोकांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com