US Election:निकाल बघायला तो हवा होता! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या उमेदवाराचा विजय

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 4 November 2020

मनाला चटका लावणारी बातमी समजत आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक पार पडल्यानंतर मजमोजणी सुरु आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. अशात एक मनाला चटका लावणारी बातमी समजत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एका उमेदवाराचा कोरोनाच्या बाधेमुळे मृत्यू झाला होता, पण त्याचा निवडणुकीत विजय झाला असल्याचे कळत आहे. डेव्हिड अन्दहल (वय 55) नोर्थ डरोटा राज्यातून निवडणुकीचे उमेदवार होते, पण ऑक्टोंबरमध्येच त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

अमेरिकेमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. त्यामुळे अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत निवडणुका पार पडल्या. त्यानंतर मजमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या जो बायडेन आघाडीवर असून त्यांनी 227 इलेक्टोरोल वोट्स मिळवले आहे, दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांना 213 इलेक्टोरोल वोट्स मिळाले आहेत. विजयासाठी 270  इलेक्टोरोल वोट्सची आवश्यकता असते, त्यामुळे बायडेन आणि ट्रम्प यांच्यामध्ये अटीतटीची लढत होताना दिसत आहे. 

राज्यात अनलॉकसंदर्भात नवीन नियमावली जाहीर; चित्रपटगृहे सुरू करण्याला परवानगी

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला आहे, ज्यो बायडेन यांनी काहीतरी घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ट्रम्प यांनी मतमोजणीत घोटाळा झाल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटलं आहे. रिपब्लिकन पक्ष जिंकत होता, खरं म्हणजे आम्ही जिंकलोच होतो, आम्ही विजयाचे सेलिब्रेशनही सुरु केले होते, पण अचानक काहीतरी झालं आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडे वोट्स झुकले, असं ट्रम्प यांचे म्हणणं आहे. 

काही ठिकाणी मतगणनेत घोटाळा झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. त्यामुळे काही राज्यातील मतमोजणी थांबवण्यात आली आहे. निकाल आता उद्या लागण्याची शक्यता आहे. काहींच्या मते निकालासाठी अनेक दिवसांची वाट पाहावी लागू शकते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidate Wins Seat in US Elections Despite Dying of Covid