नेपाळमध्ये कार तलावात कोसळून चार भारतीयांचा मृत्यू| Nepal News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेपाळमध्ये कार तलावात कोसळून चार भारतीयांचा मृत्यू
नेपाळमध्ये कार तलावात कोसळली, चार भारतीयांचा मृत्यू

नेपाळमध्ये कार तलावात कोसळून चार भारतीयांचा मृत्यू

sakal_logo
By
पीटीआय

काठमांडू : दक्षिण नेपाळमधील (Nepal) राऊतहाटमध्ये कार तलावात कोसळल्याने चार भारतीयांचा मृत्यू झाला आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार पोलिस सूत्रांनी सांगितले, की वाहन चालक व त्यातील प्रवासी दारुच्या नशेत होते. राऊतहाट जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बिनोद घिमिरे यांनी हिमालयन टाईम्सला सांगितले, की सर्व मृत प्रवाशी बिहारचे रहिवासी होते.दीनानाथ साह (वय २५), अरुण साह (३०), दिलीप महतो (२८) आणि अमित महतो (२७) अशी मृतांची नावे आहेत. गौर-चंद्रपूर रस्त्यावर वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटला आणि कार तलावात कोसळली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कार विंडशील्ड तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: सिंगल चार्जमध्ये Skoda ची इलेक्ट्रिक SUV कार धावेल ५२० किलोमीटर

मात्र तोपर्यंत त्या सर्वांचा मृत्यू झाला होता. त्यांच्याकडून मिळालेल्या आधारकार्डाच्या आधारे ओळख पटली आहे. पोलिसांनी बिहारमधील संबंधित पोलिसांशी संपर्क साधला आहे. नातेवाईक रविवारी (ता.१४) सकाळी आले असून त्यांना मृतांची ओळख पटली आहे. पोलिस म्हणाले, की वाहनाला तलावातून बाहेर काढले असून पुढील तपास सुरु आहे.

loading image
go to top