Video: मांजरीने पाडले आजोबांना बेशुद्ध...

वृत्तसंस्था
Monday, 17 August 2020

एका मांजरीमुळे आजोबा बेशुद्ध पडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 44 सेकंदाचा व्हिडिओ पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित होत आहेत.

बीजिंग (चीन): एका मांजरीमुळे आजोबा बेशुद्ध पडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 44 सेकंदाचा व्हिडिओ पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित होत आहेत.

Video: महिलेचा पती खरोखरच निघाला सुपरहिरो...

चीनमधील हार्बर शहरामध्ये ही घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, जिओ फेंगुआ ही व्यक्ती कुत्र्याला घेऊन फिरायला निघाले होते. रस्त्यावरून चालत असताना अचानक फेंगुआ यांच्या डोक्यावर मांजर पडते. मांजर पडल्यानंतर फेंगुआ बेशुद्ध पडून जागेवर पडतात. चालत असलेले आजोबा पडल्यामुळे कोणाला काही कळत नाही. आजूबाजूचे पदचारीही चांगलेच घाबरतात. मात्र या पडलेल्या आजोबांच्या मदतीला कोणीही येत नाही. मालकाच्या डोक्यावर मांजर पडल्यानंतर या व्यक्तीबरोबर असणाऱ्या त्यांचा गोल्डन रिट्रीवर कुत्रा गोंधळतो. कुत्र्यालाही काही कळत नाही. पण, काही अंतरावर त्याला मांजर दिसल्यानंतर तो तिच्यावर झडप घालण्यासाठी पुढे जातो तर मांजर त्याला पंजा मारण्याचा प्रयत्न करते.

Video: पाण्यात 16 तास अडकलेल्या युवकाची हवाई दलाकडून सुटका...

दरम्यान, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही वेळानंतर नागरिक आजोबांना उचलून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतात. आजोबांची प्रकृती सुधारली असून, ते चांगले झाले आहेत. मात्र, एका मांजराने आजोबांना बेशुद्ध पाडल्याची चर्चा रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cat jumping old mans head at china video viral