esakal | साखळी स्फोटांनी काबूल हादरले 
sakal

बोलून बातमी शोधा

काबूल : स्फोटानंतर हानी झालेल्या घराची पाहणी करताना नागरिक.

दहशतवाद्यांनी मोटारींमधून केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यांनी आज अफगाणिस्तानची राजधानी असलेले काबूल शहर हादरून गेले. शहराच्या विविध २३ भागांमध्ये झालेल्या या हल्ल्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले.

साखळी स्फोटांनी काबूल हादरले 

sakal_logo
By
पीटीआय

विविध भागांतील २३ स्फोटांमध्ये आठ जणांचा मृत्यू; ३१ जखमी
काबूल - दहशतवाद्यांनी मोटारींमधून केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यांनी आज अफगाणिस्तानची राजधानी असलेले काबूल शहर हादरून गेले. शहराच्या विविध २३ भागांमध्ये झालेल्या या हल्ल्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन मोटारींमध्ये बसून आलेल्या दहशतवाद्यांनी फिरत्या तोफांच्या साह्याने हे आज सकाळी हल्ले केले. विविध देशांचे दूतावास असलेल्या वझिर अकबर खान भागालाही त्यांनी लक्ष्य केले. या हल्ल्यांची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्यापपर्यंत स्वीकारलेली नाही. या हल्ल्यांमागे हात नसल्याचा खुलासा तालिबाननेही तातडीने केला. पोलिसांचा संशय ‘इसिस’वर असून गेल्या काही दिवसांत झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. 

ट्विटर बायडेन यांच्याकडे देणार अध्यक्षीय अकाऊंटचे अधिकार

आजच्या साखळी हल्ल्यांच्या एक तास आधी काबूलच्या पूर्व भागात एका मोटारीत लपवून ठेवलेल्या बाँबचा स्फोट होऊन एका सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात कतार येथे शांतता चर्चा सुरु असतानाच अफगाणिस्तानातील हल्ले वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने होत असलेल्या या चर्चेमध्ये संघर्ष कमी करण्याचे आवाहन अमेरिकेने वारंवार केले आहे. तालिबानने याकडे कधीही लक्ष दिलेले नाही. तालिबानी दहशतवादी अद्यापही जवळपास रोजच सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत हल्ले करत आहे. शांतता चर्चा सुरु करण्याआधी संघर्ष थांबवावा, असे आवाहन केले जात असले तरी तालिबानला ते मान्य नाही. शस्त्रसंधी हा चर्चेचाच भाग असावा आणि चर्चा समाधानकारक होत असेल तरच संघर्ष थांबेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

दर्जेदार पुस्तकांच्या यादीत 3 भारतीयांची पुस्तके; ‘न्यूयॉर्क टाइम्स’कडून यादी प्रसिद्ध

Edited By - Prashant Patil