अमेरिकेच्या व्हिसा धोरणात बदल

पीटीआय
रविवार, 24 मे 2020

कायद्यातील प्रमुख तरतुदी

 • अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेल्या विदेशी नागरिकांना व्हिसा देताना प्राधान्य
 • अमेरिकी नागरिकांना हटवून त्यांच्या जागी व्हिसाधारकांना नोकरी देता येणार नाही
 • व्हिसाधारकांना नोकरी देताना अमेरिकी नागरिकांच्या हिताला धक्का देता येणार नाही
 • प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली आपल्या देशातील कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने बोलावणाऱ्या कंपन्यांना आळा घालणे
 • कंपनीत पन्नासहून अधिक एच१ बी किंवा एल १ व्हीसाधारकांना नोकरी देण्यास मनाई
 • नियमभंग करणाऱ्या कंपन्यांची चौकशी आणि कारवाई करण्याचे कामगार विभागाला अधिकार
 • व्हिसाधारक कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कामाच्या स्वरूपाची सविस्तर माहिती ठेवणे कंपन्यांना बंधनकारक

वॉशिंग्टन - विशेष कौशल्य असलेल्या अस्थलांतरीत व्हिसा धोरणात मोठे बदल करण्यासाठी अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांत आज विधेयक मांडले. अमेरिकेतच उच्च तंत्र शिक्षण घेतलेल्या व्यावसायिकांना एच १ बी व्हिसा देण्यास प्राधान्य देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. याचा अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

एच-१ बी अँड एल -१ व्हिसा रिफॉर्म अॅक्ट असे या नव्या कायद्याचे नाव असून यामुळे प्रथमच अमेरिकेच्या नागरिकत्व विभागाला एच १ बी व्हिसा देताना प्राधान्यक्रम ठरविता येणार आहे. अमेरिकेतच शिकलेल्या विदेशातील हुशार विद्यार्थ्यांना, अति उच्च शिक्षण घेतलेल्या आणि विशेष कौशल्य असलेल्या लोकांना व्हिसा देताना प्राधान्य मिळावे, हा यामागील उद्देश आहे. या कायद्याद्वारे अमेरिकी नागरिक आणि व्हिसाधारक या दोघांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा विधेयक सादर करताना करण्यात आला. 

या देशाला सतावतेय कोरोना विषाणूचं नवं केंद्रस्थान बनण्याची भीती

कायद्यातील प्रमुख तरतुदी

 • अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेल्या विदेशी नागरिकांना व्हिसा देताना प्राधान्य
 • अमेरिकी नागरिकांना हटवून त्यांच्या जागी व्हिसाधारकांना नोकरी देता येणार नाही
 • व्हिसाधारकांना नोकरी देताना अमेरिकी नागरिकांच्या हिताला धक्का देता येणार नाही
 • प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली आपल्या देशातील कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने बोलावणाऱ्या कंपन्यांना आळा घालणे
 • कंपनीत पन्नासहून अधिक एच१ बी किंवा एल १ व्हीसाधारकांना नोकरी देण्यास मनाई
 • नियमभंग करणाऱ्या कंपन्यांची चौकशी आणि कारवाई करण्याचे कामगार विभागाला अधिकार
 • व्हिसाधारक कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कामाच्या स्वरूपाची सविस्तर माहिती ठेवणे कंपन्यांना बंधनकारक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in US visa policy