चीनने आणखी एका शेजारी देशाची कुरापत काढली

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जून 2020

टोकियोच्या वायव्येस सुमारे दोन हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या बेटांचे नाव ‘टोनोशिरो’वरून ‘टोनोशिरो सेंकाकू’ असे बदलण्यात आले. याद्वारे हा आपल्या प्रशासनाच्या अखत्यारीतील भाग असल्याचेही जाहीर करण्यात आले. ओकिनावातील इशिगाकी नगर परिषदेने तसे विधेयक मंजूर केले. चीनने याचा तीव्र निषेध केला आहे, जो जपानकडे नोंदविला जाईल.

टोकियो - गलवान खोऱ्यात भारताला डिवचल्यानंतर चीनने आणखी एका शेजारी देशाची कुरापत काढली आहे. जपानच्या ताब्यातील सेंकाकू बेटांवर हक्काचा दावा चीनने केला आहे. त्यामुळे या बेटांचे नाव व दर्जा बदलण्यासाठी जपानने कंबर कसली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

टोकियोच्या वायव्येस सुमारे दोन हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या बेटांचे नाव ‘टोनोशिरो’वरून ‘टोनोशिरो सेंकाकू’ असे बदलण्यात आले. याद्वारे हा आपल्या प्रशासनाच्या अखत्यारीतील भाग असल्याचेही जाहीर करण्यात आले. ओकिनावातील इशिगाकी नगर परिषदेने तसे विधेयक मंजूर केले. चीनने याचा तीव्र निषेध केला आहे, जो जपानकडे नोंदविला जाईल. चीनचे परराष्ट्र प्रवक्ते झाओ लिजीयन यांनी सांगितले की, ही बेटे आमचा परंपरागत प्रदेश आहे. या प्रदेशाच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्याचा आमचा निर्धार आहे. बेटांचे हे कथित प्रशासकीय फेरबदल म्हणजे चीनला चिथावणी देण्याचा गंभीर प्रकार आहे.’

फुग्यांच्या साह्याने लाखो पत्रके टाकली उत्तर कोरियाच्या हद्दीत

चीनने हा बदल करू नये, असा इशारा जपानला आधीच दिला होता. या बेटांजवळ युद्धनौकांचा ताफा चीनने सज्ज ठेवला आहे. दुसरीकडे जपानने डगमगून न जाता आपल्या निर्णयाची अंमलबजावणी केली. हा निर्णय घेताना इतर कोणत्याही देशाच्या प्रभावाचा विचार केलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chin japan disturbance