चीनकडून पुन्हा 'अरुणाचल प्रदेशवर' दावा

काही भागांना दिली चिनी नावे, भारताने दावा फेटाळला
India and China
India and ChinaSakal

बीजिंग : चीनच्या भारतविरोधी कुरापती सुरूच असून आज त्यांनी पुन्हा अरुणाचल प्रदेशवर दावा सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अरुणाचलमधील पंधरा ठिकाणांची नावे बदलण्याच्या कृत्याचे समर्थन करतानाच ड्रॅगनने तिबेटचा हा दक्षिण भाग आमच्या प्रदेशाचे अविभाज्य अंग असल्याचे म्हटले आहे. भारताने मात्र हा दावा खोडून काढला आहे. हा भाग आमच्या देशाचा अविभाज्य होता आणि भविष्यामध्येही तो तसा राहील असे सांगत या भागांची नावे बदलल्याने सत्य बदलत नाही असे म्हटले आहे.(China news)

India and China
कोरोना असल्याचं विमानात कळलं, बाथरुमध्येच केलं क्वॉरनटाईन

चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशातील पंधरा प्रदेशांना वेगळी चिनी नावे दिली असून हा भाग दक्षिण तिबेट असल्याचा दावा चीनकडून वारंवार केला जातो. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, ‘‘ चीनने याआधीही अशाच प्रकारच्या कुरापती केल्या होत्या, नामांतराचे कृत्य देखील हे काही पहिल्यांदाच होते आहे असे नाही. चीनने एप्रिल-२०१७ मध्ये देखील अशाच पद्धतीने या भागांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला होता. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि तो नेहमी राहील. चीनने केवळ नावे बदलल्याने सत्य बदलत नाही.’’(Arunachal Pradesh was and will always be an integral part of India)

India and China
परदेशातून भारतात येण्यापूर्वी जाणून घ्या नियमावली

चीनचे म्हणणे

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान भारताच्या प्रतिक्रियेबाबत म्हणाले की,‘‘ तिबेटचा हा दक्षिण भाग चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाचे अंग असून तो आमच्याच भूभागामध्ये येतो. या भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध वंशाचे लोक राहतात, त्यांनीच या भागाला वेगवेगळी नावे दिली आहेत. चिनी कायद्यांच्या चौकटीत या भागाचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याला चिनी नावे देण्यात आली आहेत. हा चीनच्या सार्वभौमत्वाशी निगडित मुद्दा आहे.’’(India china news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com