परदेशातून भारतात येण्यापूर्वी जाणून घ्या नियमावली

flight
flight

जगभरातील सरकारने प्रवासी निर्बंध वाढवल्यामुळे, हाय-फ्रिक्वेंसी प्रवासी मार्गांसाठी सुलभ प्रवास कसा होईल याचा देखील विचार केला जात आहे. भारत सरकारने तब्बल 34 देशांमध्ये हवाई वाहतूक करार विस्तारून भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी पर्याय सोपे केले आहे. सौदी अरेबियाने उमराहला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या प्रवासाची सोय करण्यासाठी आता नवीन देश जोडला गेला आहे.

भारत सरकारच्या 20 डिसेंबर 2021 च्या परिपत्रकानुसार, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबादसह भारतातील शहरांमध्ये येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना किंवा 'संभाव्य धोका असलेल्या देशांतून” प्रवास करणाऱ्यांना रॅपीड PCR किंवा RT-PCR चाचणीसाठी आधीच बुकीं करणे बंधनकारक आहे. 9 डिसेंबर 2021 पर्यंत, धोका असलेल्या देशांमध्ये यूके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, घाना, चीन, मॉरिशस, टांझानिया, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, हाँगकाँग आणि इस्रायल यासह युरोपमधील देशांचा समावेश आहे.

धोका असलेल्या देशांमधून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना निगेटिव्ह रिपोर्ट आल्याशिवाय विमानतळ सोडण्याची किंवा कनेक्टिंग फ्लाइट्सकडे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने(The Directorate General of Civil Aviation) आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील (international flights)पूर्वीची बंदी 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढवली आणि सांगितले की ते case-to-case आधारावर निवडक आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सना परवानगी देण्यात येईल. भारतीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ( Indian Aviation Minister Jyotiraditya Scindia) यांनी यापूर्वी सांगितले होते की,''15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू होऊ शकतात. हा आदेश त्यांनी नंतर नवीन कोरोनाव्हायरस प्रकार ओमिक्रॉनमुळे उद्भवलेल्या संदिग्धतेच्या पाश्वभूमीवर मागे घेतला.

गेल्या वर्षी मे महिन्यापासून सरकारच्या प्रमुख वंदे भारत मिशनद्वारे(government’s flagship Vande Bharat Mission) विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे (Special international flights) सुरू आहेत. जुलै 2020 पासून काही हवाई प्रवासाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. कोविड-19 साथीच्या रोगाचा परिणाम म्हणून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे निलंबित असताना व्यावसायिक प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने "ट्रान्सपोर्ट बबल" (Transport bubbles) किंवा "विमान प्रवास व्यवस्था" (“air travel arrangements”)ही दोन देशांमधील तात्पुरती व्यवस्था सुरू करण्यात आली. . सरकारच्या माहितीनुसार, हे करार परस्पर स्वरूपाचे आहेत, म्हणजे दोन्ही देशांतील विमान कंपन्यांना समान फायदे मिळतात.

flight
बॉम्बस्फोटानं पाकिस्तान पुन्हा हादरलं; स्फोटात चार जणांचा मृत्यू

यू.एस., यूके, कॅनडा आणि सिंगापूर या प्रमुख पर्यटन स्थळांवरून भारतात प्रवास करण्याबाबतची नवीन निर्बंध आणि मार्गदर्शक तत्वे

यूएस ते भारत प्रवास

प्री-बोर्डिंग

भारताचा प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत, यूएस, द सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)ने लेव्हल 1 ट्रॅव्हल हेल्थ नोटिस जारी केली आहे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संभाव्य धोका असेलेल्या देशांमधून प्रवास करताना यूएस नागरिकांना अधिक सावधगिरी बाळगण्यास प्रोत्साहित करणारी स्टेट लेव्हल 2 ट्रॅव्हल अॅडव्हायझरी डिपार्टमेंट ऑफ स्टेटने जारी केली आहे.

यूएस नागरिकांना सल्ला दिला जातो:

  • प्रवासापूर्वी पूर्णपणे लसीकरण करा

  • फ्लूच्या मोठ्या प्रादुर्भावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी फ्लूचे शॉट्स घेणे. Covid-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भारताने सुरू केलेल्या उपायांचे पालन करा.

  • 6 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेला पर्यटक किंवा ई-टुरिस्ट व्हिसा असलेल्या व्यक्तींसाठी पर्यटन आणि इतर अल्प-मुदतीच्या उद्देशांसाठी भारताचा प्रवास 15 नोव्हेंबरपासून पूर्णपणे पुन्हा सुरू झाला. युएस सरकारने म्हटले आहे की, ऑक्टोबर 2021 पूर्वी जारी केलेल्या पर्यटक व्हिसा चालणार नाही आणि यापैकी एख्दा व्हिसा वापरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यां प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठविण्याची शक्यता आहे.

  • काही व्यावसायिक प्रवासी, तसेच रहिवासी म्हणून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींसह प्रवाशांच्या अतिरिक्त श्रेणींना परवानगी आहे.

  • भारतात येणार्‍या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी, लसीकरण झाले असो किंव नसो, भारतासाठी प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांच्या आत घेतलेल्या RT-PCRचाचणीचा निगेटिव्ह रिपोर्टसह स्व-घोषणा(self-declaration) हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.

भारतात आल्यानंतर...

  • भारतात आल्यावर सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाईल.

  • लक्षणे असलेल्या प्रवाशांचे विलगीकरण केले जाईल आणि त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल. रॅपिड टेस्टचा वापर करणार्‍या प्रवाश्यांना 3,500 रुपये शुल्क आकारले जाईल आणि विमानतळावर उतरण्यासाठी लँडिंगनंतर दीड तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. PCRचाचणीचा वापर करणार्‍या प्रवाशांना 500 रुपये शुल्क आकारले जाईल आणि विमानतळावर उतरल्यानंतर 5 तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

  • निगेटिव्ह रिपोर्ट असलेल्या प्रवाश्यांना सात दिवस होम क्वारंटाईन करणे, आठव्या दिवशी पुन्हा चाचणी करणे आणि अतिरिक्त सात दिवस सेल्फ-मॉनिटर करणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह असेल त्यांना कडक आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल.

भारतात प्रवास करण्यासाठी

  • भारतात व्यावसायिक उड्डाणे सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे पर्यायांच्या संख्या कमी झाली आहे आणि भारत सरकारच्या निर्बंधांनुसार ही उड्डाणे कोण बुक करू शकतात किंवा बोर्ड करू शकतात याबद्दल एअरलाइन्सची कठोर धोरणे असू शकतात.

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क नसलेल्या व्यक्तींना पालन न केल्याबद्दल 2,000 रुपये इतका दंड आकारला जाऊ शकतो. एका राज्यापेक्षा दुसऱ्या राज्यात ही रक्कम वेगळी असते.

flight
बँकेने चुकून हजारो लोकांना पाठवले 1300 कोटी, परत घेताना होतेय दमछाक

यूकेमधून भारतात प्रवास करताना

सर्व नियमित नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे निलंबित राहतील. तथापि, यूके आणि भारत सरकारमधील द्विपक्षीय करारानुसार, भारत आणि यूके दरम्यान मर्यादित संख्येत उड्डाणे सुरू आहेत.

प्री-बोर्डिंग

  • सर्व प्रवाश्यांना भारत सरकारने ठरवलेल्या सामान्य आदेशाचे पालन करावे लागेल. त्यात नियोजित प्रवासापूर्वी ऑनलाइन हवाई सुविधा पोर्टलवर स्व-घोषणापत्र(self-declaration), प्रवास सुरू करण्यापूर्वी ७२ तासांच्या आत घेतलेल्या टेस्टचा निगेटिव्ह कोविड-१९चा आरटी-पीसीआर रिपोर्ट अपलोड करणे, याच्या सत्यतेच्या संदर्भात एक घोषणा(Delcration)समाविष्ट असेला अहवाल सादर करावा लागे.

  • जर तुम्ही कोरोनाव्हायरसची लक्षणे दाखवत असाल तर तुम्ही प्रवास करू शकणार नाही (तुम्हाला स्वत:ला अलग करावे लागेल आणि नंतर प्रवास करावा लागेल). प्रवाशांनी तुमच्या उड्डणापूर्वी अधिकाऱ्यांनी केलेल्या कोणत्याही अतिरिक्त आरोग्यसेवा तपासणी उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.

भारतात आल्यानंतर...

  • यूके हे भारत सरकारच्या धोका असलेल्या देशांच्या यादीमध्ये असल्याने, प्रवाशांनी त्यांची RT-PCR चाचणी प्री-बुक करणे आवश्यक आहे आणि कनेक्टिंग फ्लाइट सोडण्यापूर्वी किंवा घेण्यापूर्वी आगमन झालेल्या विमानतळावर त्यांच्या चाचणी निकालांची प्रतीक्षा करणे देखील आवश्यक आहे.

  • कोविड-19 चाचणी निगेटिव्ह आल्यास, प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाईन करावे लागेल. भारतात आगमनाच्या 8 व्या दिवशी आणखी कोविड-19 चाचणी आवश्यक आहे. 8व्या दिवसाची चाचणी निगेटिव्ह आल्यास, प्रवाशांनी पुढील सात दिवस स्वत:च्या तब्येतीचे निरीक्षण करावे.

  • कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट करणाऱ्या कोणत्याही प्रवाशांना 10 दिवसांच्या कालावधीसाठी स्वतंत्र आयसोलेशन सुविधेत उपचार आणि पुढील निरीक्षण करावे लागेल.

भारतात प्रवास करताना

  • आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान प्रवासासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवेश निर्बंध भिन्न असू शकतात आणि यामध्ये परदेशी नागरिकांसाठी प्रवेश प्रतिबंधित करणे किंवा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विलगीकरण करणे अनिवार्य करणे समाविष्ट असू शकते. प्रवेश निर्बंध अगदीच शॉर्ट नोटीसवर बदलू शकतात. प्रवास करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या एअरलाइनशी संपर्क साधावा.

  • भारतीय नागरिकांशिवाय, पूर्व आणि ईशान्य भारतातील बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि नेपाळच्या सर्व सीमारेषा लोकांसाठी बंद आहेत.

  • प्रवाशांना संपर्क तपशील प्रदान करावा लागेल आणि त्यांना आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाईल.

कॅनडातून भारतात प्रवास करताना

प्री-बोर्डिंग

  • पूर्वीच्या ऑर्डरनुसार कॅनडातून येणार्‍या प्रवाशांसाठी चाचणी अहवालाची आवश्यकता नाही हे अपडेट केले गेले असून भारत सरकारने आता आरटी-पीसीआर चाचणी उड्डाणापूर्वी ७२ तास अगोदर अनिवार्य केली आहे, भारतात आल्यानंतर 14 दिवस विलगीकरण आवश्यक आहेत.

  • वंदे भारत मिशन आणि दिल्लीला जाणारी उड्डाणामधील दोन्ही प्रवाशांसाठी एअर ट्रान्सपोर्ट बबल व्यवस्था भारतात प्रवास करण्यासाठी उपलब्ध आहेत.

  • सर्व प्रवाश्यांना शक्यतो नियोजित प्रवासाच्या ७२ तास अगोदर स्व घोषित पत्र ऑनलाइन हवाई सुविधा पोर्टलवर सबमिट करावा लागेल.

भारतात आल्यानंतर

  • कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेले प्रवासी त्यांच्या अंतिम ठिकाणी पोहोचण्यासाठी देशांतर्गत उड्डाणांसह सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करू शकतात.

  • यापूर्वी फक्त गरोदर स्त्रिया, कुटुंबात मृत्यूमुखी पडलेल्या, गंभीर आजाराने ग्रस्त असलेले, 10 वर्षांखालील मुलांसोबत असलेले पालक आणि निगेटिव्ह RT-PCR प्रमाणपत्र असलेल्यांना क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली होती. भारत सरकारने निगेटिव्ह RT-PCRअहवाल अनिवार्य केल्याने हे आता बदलले आहे, ज्यामुळे 14 दिवसांचे अलग ठेवणे अनिवार्य आहे.

सिंगापूरमधून भारतात प्रवास करताना

प्री-बोर्डिंग

  • 11 डिसेंबरपर्यंत, भारताने सिंगापूरला धोका असलेल्या देशांच्या यादीतून काढून टाकले आणि सिंगापूरमधील लसीकरण झालेल्या प्रवाशांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जात आहे.

  • भारतामध्ये सिंगापूरहून येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय लोकांनी एअर सुविधा पोर्टलद्वारे ऑनलाइन स्वघोषणा फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे आणि उड्डाणापूर्वी 72 तासांच्या आत घेतलेल्या नकारात्मक COVID-19 RT-PCR चाचणीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

  • परदेश प्रवासासाठी सिंगापूरमध्ये Covid-19 RT-PCR घेतलेल्या प्रवाशांना सिंगापूरकडून डिजिटल चाचणी निकाल प्रमाणपत्र मिळेल. प्रवाशांना क्लिनिकच्या मदतीने आणि/किंवा सिंगापूरच्या सरकारी वेबसाइट Notariseद्वारे त्यांच्या चाचणी रिझल्टचे डिजिटल प्रमाणीकरण करावे लागेल. सर्व यशस्वीरित्या प्रमाणीकृत डिजिटल रिझल्ट सर्टिफिकेट नंतर क्यूआर कोडमध्ये रूपांतरित केली जातात, जी परदेशात बोर्डिंग आणि इमिग्रेशन क्लिअरन्स दरम्यान वापरली जाऊ शकतात.

  • ज्या प्रवाशांनी 10 डिसेंबरपूर्वी ऑफलाइन QR कोड जनरेट केले आहेत आणि व्हेरिफिकेशनदरम्यान लसीकरणाच्या समाप्ती तारखेच्या अडचण येत असल्या त्यांना त्यांचे QR कोड Notarise वर पुन्हा तयार करण्याचा सल्ला दिला जात आहे.

भारतात आल्यानंतर...

  • सिंगापूरहून येणार्‍या सर्व प्रवाशांना विमानतळावर स्व-खर्चाने Covid-19 RT-PCR चाचणी करावी लागते आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास विमानतळ सोडता येईल.

  • सिंगापूर सरकारने आपल्या नागरिकांना भारतातील कोविड-19 निर्बंधांसह इमिग्रेशन प्रक्रिया आणि प्रवेश निर्बंधाबाबत माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे.

  • सरकार प्रवाशांना सल्ला दिला आहे की,

  • सर्वसमावेशक प्रवास विमा खरेदी करा (comprehensive travel insurance)आणि अटी आणि कव्हरेज बाबत माहिती घ्या.

  • व्हेरिफिशवेळी प्रवेशासाठी आवश्यकता, सद्य परिस्थिती, स्थानिक कायदे आणि रीतिरिवाज यांविषयी माहिती करून घ्या

  • आपत्कालीन संपर्क करण्यास सक्षम होण्यासाठी राष्ट्रीय व्यवहार मंत्रालय, सिंगापूरच्या वेबसाइटवर ई-नोंदणी करा.

flight
ओमिक्रॉनवर लसीकरणच प्रभावी; WHOच्या डॉ. स्वामिनाथन यांचा दावा

दुबईतून भारतात प्रवास करताना....

प्री-बोर्डिंग

  • दुबईतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांना उड्डाण करण्यापूर्वी कोविड आरटी-पीसीआर चाचणी घ्यावी लागते. त्यांना यासह कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे:

  • नियोजित उड्डाणापूर्वी आगमन राज्याच्या विमानतळाच्या वेबसाइटवरील हवाई सुविधा विभागात स्वयं-घोषणापत्र अपलोड करणे.

  • प्रवाशांनी स्व-घोषणापत्राची छापील रंगीत प्रत सोबत बाळगणे अपेक्षित आहे.

  • सर्व प्रवाशांनी त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र हवाई सुविधा विभागात अपलोड केले पाहिजे आणि त्यांच्या प्रमाणपत्राची छापील प्रत सोबत ठेवावी.

  • भारतात प्रवास करणाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवर भारत सरकारचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप, आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करणे अपेक्षित आहे.

भारतात आल्यानंतर...

आगमनानंतर, मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशांना वगळता सर्व प्रवाशांनी खाली नमूद केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे:
  • विमानतळावर त्यांच्या स्वखर्चाने कोविड चाचणी करावी आणि निकालाची प्रतीक्षा करावी. 5 वर्षांखालील मुलांना आगमन चाचणीतून सूट देण्यात आली आहे. निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांनी 7 दिवस होम क्वारंटाईन करणे आणि आगमनानंतर 8 व्या दिवशी दुसरी चाचणी घेणे अपेक्षित आहे.

  • ज्या प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आढळेल ते संबंधित राज्य सरकारच्या प्रोटोकॉलनुसार विलग केले जातील.

  • केरळमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी, ऑन-अरायव्हल आण्विक चाचणी विनामूल्य असेल.

मुंबईला पोहोचल्यावर, प्रवाशांनी खाली नमूद केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे:
  • मुंबईचे रहिवासी असलेल्या सर्व प्रवाशांना सात दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये राहणे आणि सातव्या दिवशी RT-PCR चाचणी घेणे बंधनकारक आहे.

  • चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवाशांना संस्थात्मक अलग ठेवण्याच्या सुविधेमध्ये राहवे लागेल.

  • संस्थात्मक क्वारंटाईन दरम्यान, RT PCR चाचणी दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी प्रवाशांना स्व-खर्चावर करावी लागेल.

flight
देशात ओमिक्रॉनचा दुसरा बळी? राजस्थानमध्ये ७३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

उर्वरित ठिकाणाहून भारतात येण्यासाठी

भारतासह सर्व देशात असलेल्या वाहतूक बबल व्यवस्था ( Transport bubble systems) प्रवाशांना भारतात येण्याची परवानगी देतात. अमेरिका, यूके, कॅनडा आणि सिंगापूर व्यतिरिक्त, भारतासोबत हवाई बबल करार (air bubble agreements) असलेल्या देशांमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बहारीन, बांगलादेश, भूतान, इथिओपिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इराक, जपान, केनिया, कुवेत, मॉरिशस, नेपाळ यांचा समावेश आहे. , नेदरलँड, नायजेरिया, ओमान, कतार, रशिया, रवांडा, सेशेल्स, श्रीलंका, स्वित्झर्लंड, टांझानिया, युक्रेन, संयुक्त अरब अमिराती, उझबेकिस्तान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com