हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या रिसर्च पेपरमध्ये घोटाळा, WHO नेसुद्धा भूमिका बदलली

covid 19 medicine research scandal
covid 19 medicine research scandal

न्यूयॉर्क, ता. 07 : कोरोना व्हायरसने जगात धुमाकूळ घातला असताना आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. कोरोना व्हायरसबाबत मोठा रिसर्च घोटाळा समोर आला आहे. आरोग्य क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध वृत्तपत्र द लँसेटनं मलेरियावर वापरलं जाणारं क्लोरोक्विन आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विनवर केलेल्या रिसर्च पेपरला मागे घेतलं आहे. या लेखकांनी दावा केला होता की, अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या लढ्यात गेमचेंजर म्हणून हे औषध वापरल्यानं रुग्णांचा मृत्यू झाला.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्येही हा लेख प्रकाशित करण्यात आला होता. यामध्ये चार संशोधकांचा समावेश होता. डॉक्टर मनदीप आर मेहरा, डॉक्टर अमित एन पटेल, डॉक्टर सपन देसाइन आणि डॉक्टर फ्रँक हे होते. मात्र हे संशोधन खोटं होतं असं समोर आल्यानंतर जर्नलने ते हटवलं आहे. अद्याप जर्नलने पुढच्या कारवाईबाबत कोणतं वक्तव्य केलेलं नाही.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी फारसे परिणामकारक नाही असा दावा करण्यात आला असतानाच हा रिसर्च पेपर पब्लिश झाला. त्यामुळे दाव्याला आणखी बळ मिळालं होतं. याच्याआधीही न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनद्वारे असाच एक रिसर्च पेपर पब्लिश करण्यात आला होता.

रिसर्च पेपरचा हा घोटाळा उघड होत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनंसुद्धा औषधांच्या सेवनाबाबत घेतलेल्या भूमिकेत बदल केला होता. WHO चे संचालक टेड्रोस यांनी सांगितलं की, तज्ज्ञांनी या औषधांच्या सुरक्षिततेसंबधी माहितीचा अभ्यास करून पुन्हा संशोधनाची गरज असल्याची शिफारस केली आहे. दरम्यान, कार्यकारी संचालकांनी यातील सर्व औषधांचा वापर सुरु ठेवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. तसंच कोरोनाच्या औषधांसाठी परीक्षण करण्यात येत असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुन्हा वापर सुरू केला जाईल असंही म्हटलं आहे.

शिफारशीचा अर्थ असा आहे की, ज्या रुग्णांनी स्वता:वर कोरोनाच्या औषधांच्या चाचणीला मान्यता दिली त्यांनाच डॉक्टर हे औषध देतील. WHO चे संचालक म्हणाले की जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षा समितीने एचसीक्यूच्या जागतिक डेटाची चाचणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com