छायाचित्र प्रसिद्ध केल्यावरुन चीनने ऑस्ट्रेलियाची माफी मागण्यास दिला स्पष्ट नकार

यूएनआय
Wednesday, 2 December 2020

ऑस्ट्रेलियाचा सैनिक अफगाणिस्तानमधील लहान मुलाचा गळा चिरत असल्याचे फेरफार केलेले छायाचित्र प्रसिद्ध केल्यावरुन चीनने ऑस्ट्रेलियाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आमच्याकडून माफीची अपेक्षा करण्यापेक्षा ऑस्ट्रेलियाला लाज वाटायला हवी, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

बीजिंग - ऑस्ट्रेलियाचा सैनिक अफगाणिस्तानमधील लहान मुलाचा गळा चिरत असल्याचे फेरफार केलेले छायाचित्र प्रसिद्ध केल्यावरुन चीनने ऑस्ट्रेलियाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आमच्याकडून माफीची अपेक्षा करण्यापेक्षा ऑस्ट्रेलियाला लाज वाटायला हवी, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अफगाणिस्तानमध्ये तैनात असताना अत्याचार केलेल्या काही सैनिकांवर ऑस्ट्रेलिया सरकारने स्वत:हून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यावरून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ऑस्ट्रेलियाचा एक सैनिक एका लहान मुलाचा गळा चिरत असल्याचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. यावरून संतापलेल्या ऑस्ट्रेलियाने चीनकडून माफीची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने माफी मागण्यास नकार दिला. ‘आमच्या ट्वीटवर ऑस्ट्रेलियाची फारच तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. असे का? अफगाण नागरिकांची त्यांच्या सैनिकांनी क्रूरपणे केलेली हत्या त्यांना चालू शकते, पण त्यावर टीका केलेली झोंबते. अफगाणिस्तानमध्येही माणसेच राहतात. आम्ही माफी मागावी अशी मागणी करण्याऐवजी त्यांना आपल्या सैनिकांच्या कृत्यावर लाज वाटायला हवी,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

२६/११ हल्ल्यातील कामगिरीबद्दल सर्वोच्च पदक द्या; तहव्वूर राणाची पाकिस्तानकडे मागणी 

ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडची साथ
चीन सरकारने प्रसिद्ध केलेल्या आक्षेपार्ह छायाचित्रावर आज न्यूझीलंडनेही आक्षेप घेतला. न्यूझीलंडने आपली नाराजी थेट चिनी सरकारकडे नोंदविली आहे. ‘हे अत्यंत असंयुक्तिक छायाचित्र होते. अशा प्रकाराबद्दल आम्हाला काळजी वाटते. त्यामुळेच आम्ही थेट चीन सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे,’ असे पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी आज सांगितले.

चीनने निभावली मैत्री! किम जोंग उनला दिली कोरोना लस

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China explicitly refuses to apologize to Australia over photo release