China Fireworks Factory Explosion
esakal
China fireworks factory explosion Liuyang 2026 : चीनच्या हुनान प्रांतातील लियुयांग शहरात सोमवारी एक भीषण दुर्घटना घडली. हुआशेंग फायरवर्क्स कंपनीच्या फटाक्यांच्या कारखान्यात अचानक प्रचंड स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की संपूर्ण कारखान्याला आग लागली आणि काळ्या धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरले.