चीनचा लडाखमधील अनेक भागावर अजूनही ताबा; अमेरिकन कमांडरचा दावा

india_china
india_china

वॉशिंग्टन- अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनचे प्रमुख सैन्य कमांडर अॅडमिरल फिलिप एस डेविडसन यांनी लडखमध्ये भारत-चीनमध्ये असलेल्या तणावाप्रकरणी मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणालेत की, भारतासोबतच्या संघर्षानंतर चीनने एलएसी जवळच्या ज्या भागांवर ताबा मिळवला होता, त्यातील अनेक मुख्य भागातून चीन मागे हटला नाही. डेविडसन म्हणाले की, अमेरिकेने भारताला माहिती आणि थंड भागामध्ये आवश्यक असणारे कपडे, उपकरणे पुरवून सीमा वाद सोडवण्यास मदत केली आहे. तसेच चीनने सीमेवर निर्माण केलेल्या तणावामुळे भारताला जाणीव झालीये की त्यांना संरक्षण क्षेत्रात अजून दुसऱ्या देशांच्या सहकार्याची गरज आहे.

पीएलएने सुरुवातीच्या संघर्षात ज्या भागावर ताबा मिळवला होता, त्यातील अनेक भागातून त्यांनी माघार घेतली नाही. याभागात चिनी सैन्य अजूनही तैनात आहे. भारताला संकटाच्या वेळी आम्ही माहिती पुरवली आहे. शिवाय काही उपकरणे पुरवली आहेत. आम्ही सागरी सहयोगालाही प्रोत्साहन देत आहोत. चीनला टक्कर देण्यासाठी चार देशांचे क्वाड प्रभावी ठरु शकते. ऑस्ट्रेलिया आणि जापान आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावता दिसतील, असं डेविडसन म्हणाले आहेत. 12 मार्चेला भारत, अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या प्रमुख नेत्यांचे संमेलन ऑनलाईन पद्धतीने भरवले जाणार आहे. 

दरम्यान, 5 मे रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. त्यानंतर 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तमय संघर्ष झाला. अनेक दशकानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली होती. संघर्षात दोन्ही देशांना नुकसान झाले . भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनचे 40 सैनिक मारले गेले असल्याची माहिती भारत सरकारने दिली होती. असे असले तरी चीनने आपल्या सैनिकांच्या मृत्यूचा आकडा जाहीर केलेला नाही. 

दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. दुसरीकडे सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणात सैनिकांची तैनाती केली. भारताने प्रत्युत्तर म्हणून 50 हजार सैनिक सीमेवर तैनात केले. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सीमेवर आणण्यात आला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. त्यानंतर भारत आणि चीनच्या दरम्यान चर्चेची नववी फेरी पार पडली. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघार घेण्यावर सहमती दर्शवली. चीनचे सैन्य पैंगोग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यापासून माघार घेतल्याचं सांगितलं जातं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com