
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जॅक मा यांनी देशातील आर्थिक नियम आणि सरकारी बँका यांच्यावरून जोरदार टीका केली होती. यानंतरच त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.
बिजिंग - चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जॅक मा यांच्या अचानक बेपत्ता होण्याची चर्चा सध्या जगभर सुरु आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जॅक मा यांनी देशातील आर्थिक नियम आणि सरकारी बँका यांच्यावरून जोरदार टीका केली होती. यानंतरच त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. गेल्या दोन महिन्यापासून ते बेपत्ता असून याप्रकरणी चीनचे राष्ट्रपती शि जिनपिंग यांच्याकडे शंकेचं बोट दाखवलं जात आहे. जॅक मा यांच्याआधीही अनेक अब्जाधिशांची अवस्था वाईट करण्यात आली आहे.
बिझनेसमनला 18 वर्षांचा तुरुंगवास
जिनपिंग यांच्याकडे बोट दाखवलं जाण्याचं कारण म्हणजे टीका करणारे जॅक मा हे पहिलेच नाहीत ज्यामुळे चीनची नाराजी ओढावली. मार्च महिन्यात एक प्रॉपर्टी बिझनेसमन रेन झीकियांगसुद्धा अशाच पद्धतीने बेपत्ता झाला होता. कोरोना व्हायरसशी लढा देण्यात गोंधळ घातल्याचं म्हणत राष्ट्रपती शी जिनपिंग यांना जोकर म्हटलं होतं. ते बेपत्ता झाल्यानंतर 6 महिन्यांनी त्यांनी भ्रष्टाचाराचे गुन्हे मान्य केले होते. या प्रकरणात रेन यांना 18 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
हे वाचा - 'अलीबाबा'चे जॅक मा कुठं गेले ? गेल्या दोन महिन्यांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता
अब्जाधीशाला ठेवलं नजरकैदेत
2017 मध्ये अब्जाधीश फायनान्सर शियान जियान्हुआला हाँगकाँगच्या एका हॉटेलमधून चीनमध्ये आणलं होतं. त्याची अधिकृत माहिती होणालाही नाही असं सांगितलं जातं. मात्र तीन वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांना नजरकैदेत ठेवलं होतं. फक्त उद्योगपतीच नाही तर चीन अशा लोकांवरही अंकुश आणतं जे सरकारविरोधात तोंड उघडतात.
कोरोनाबाबत माहिती देणाऱ्या डॉक्टरला त्रास
कोरोना व्हायरसबाबत पहिल्यांदा माहिती देणाऱ्या डॉक्टर ली वेन्लियांगविरोधात कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. वेन्लियांग यांनी डिसेंबर महिन्यात कोरोना व्हायरस पसरल्याचं समोर आणलं होतं. 31 डिसेंबरला त्यांनी वी चॅटवर चीनच्या लोकांना इशारा दिला होता की, देशात SARS सारखा व्हायरस पसरत आहे. यानंतर सोशल मीडियावर अफवा पसरवल्याच्या आरोपाखाली त्रास देण्यास सुरुवात केली. शेवटी वेन्लियांग यांनाच कोरोना झाला आणि त्यातच मृत्यूही.
हे वाचा - विकिलिक्सचे संस्थापक असांजेला तुमच्याकडे सोपवणार नाही; यूकेनं अमेरिकेला ठणकावलं
जॅक मा का निशाण्यावर?
जगभरात आदर्श म्हणून जॅक मा यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना सरकारला आवाहन केलं होतं की, बिझनेसमध्ये नवीन काही सुरु करण्याच्या प्रयत्नांना दाबलं जातं आणि अशी व्यवस्था बदलण्यात यावी. त्यांनी जागतिक बँकेच्या नियमांना वृद्धांचा क्लब म्हटलं होतं. या भाषणानंतर चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा रोषही जॅक मा यांनी ओढवून घेतला. यानंतरच जॅक मा यांच्या व्यवसायाविरोधात बंदी लावण्यास सुरुवात केली गेली.