12 लाखाच्या शहरात सापडले फक्त तीन रुग्ण; चीनने डायरेक्ट लावला लॉकडाऊन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China

12 लाखाच्या शहरात सापडले फक्त तीन रुग्ण; चीनने डायरेक्ट लावला लॉकडाऊन

बीजिंग : चीनमध्ये कोरोनाचे (Corona in China) वाढते रुग्ण पाहता अनेक शहरात अंशत: तर काही ठिकाणी कडक लॉकडाउन लागू करण्यात येत आहे. मध्य चीनमधील हेनान प्रांतातील सुमारे बारा लाखांची लोकसंख्या असलेल्या युझोऊ (Yuzhou city) शहरात सोमवारपासून लॉकडाउन (lockdown) लागू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी केवळ तीन रुग्ण सापडलेले असतानाही प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. शॉपिंग मॉल, म्युझियम आणि पर्यटनस्थळ देखील बंद करण्यात आले आहेत.

हेही वाचा: हरप्रित चंडींनी घडवला इतिहास, उणे ५० अंश सेल्सिअस तापमानात ट्रेक पूर्ण

चीनमधील कोरोनाच्या आकड्यावरून नेहमीच प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. मात्र चीनच्या सरकारची आकडेवारी गृहित धरली तर गेल्या वर्षी युझोऊ शहरात १० ऑगस्टला १४३ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १७ डिसेंबरपर्यंत कोणताही नवीन रुग्ण नव्हता. १८ डिसेंबरला १२५ रुग्ण बाधित आढळले. २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात २०० ते २१० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हाच आकडा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी २३१ वर पोचला. १७ एप्रिल २०२० नंतर प्रथमच एवढा मोठा आकडा आहे. त्यावेळी चीनमध्ये ३२५ बाधित झाले होते. चीनमध्ये कोविड आढळल्यानंतर रुग्णसंख्या कमी करण्याचे धोरण राबविले जात आहे. चीनने सीमा बंद केल्या आहेत. अनेक भागात लॉकडाउन लागू केले आहे. १.३ कोटी लोकसंख्या असलेल्या शियान शहरात तब्बल दोन आठवड्यापासून लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. चीनमध्ये कोरोना शून्यावर आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले जात असल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सेवा स्थगित करण्यात येत आहेत.

हेही वाचा: ओमिक्रॉननंतर आता 'IHU' ची एन्ट्री; फ्रान्समध्ये आढळला नवा व्हेरियंट

अमेरिकेत चोवीस तासात १० लाखांहून अधिक रुग्ण

अमेरिकेत ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. आतापर्यंतच्या सर्व लाटांच्या तुलनेत या लाटेत एका दिवसात तीन पट अधिक रुग्णसंख्या नोंदली गेली आहे. सोमवारी अमेरिकेत १० लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. काल सायंकाळी जॉन हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीने जाहीर केलेल्या डेटानुसार, रविवारच्या तुलनेत सोमवारी १०.४२ लाख अधिक रुग्ण नोंदले गेले. ही संख्या कोणत्या भागातील आहे, हे मात्र उघड केले नाही. दरम्यान, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने फायजर बायोएनटेकची बूस्टर लस १२ ते १५ वयोगटातील मुलांना देण्याची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियात कोरोनाचे रूग्ण वाढले

ऑस्ट्रेलियात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. न्यू साऊथ वेल्स येथे चोवीस तासात २३१३१ रुग्ण आढळले. त्याचवेळी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी २२,५७७ नव्या रुग्णांची नोंद झाली. याठिकाणी रुग्णालयात सध्या १,३४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या सोमवारच्या तुलनेत दीडशेहून अधिक आहे. न्यू साऊथ वेल्सचा पॉझिटिव्ही रेट हा २८ टक्के आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusChina
loading image
go to top