esakal | भारताची चिंता वाढली; ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधणार धरण!
sakal

बोलून बातमी शोधा

china xi jinping

चीनच्या संसदेने गुरुवारी चौदाव्या पंचवार्षिक योजनेला मान्यता दिली असून यामुळे अनेक मेगा प्रकल्पांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरील बहुचर्चित जलविद्युत प्रकल्पाचा देखील समावेश आहे.

भारताची चिंता वाढली; ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधणार धरण!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीजिंग - चीनच्या संसदेने गुरुवारी चौदाव्या पंचवार्षिक योजनेला मान्यता दिली असून यामुळे अनेक मेगा प्रकल्पांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरील बहुचर्चित जलविद्युत प्रकल्पाचा देखील समावेश आहे. हा प्रकल्प तिबेटमध्ये उभारला जात आहे. मात्र तो अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागून असल्याने भारताच्या चिंता वाढल्या आहेत. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने पंचवार्षिक आराखड्याला मान्यता दिली असून यामध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन हजार कार्यकर्त्यांचा समावेश आहे. चीनने 2035 पर्यंत देशामध्ये मोठी आर्थिक आणि सामाजिक प्रगती साध्य करण्याचे ध्येय निश्‍चित केले असून यासाठी हे पंचवार्षिक धोरण (2021-2025) स्वीकारण्यात आले आहेत.

मागील सहा दिवसांपासून चीनच्या पीपल्स काँग्रेसचे हे अधिवेशन सुरू होते. या अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या अधिवेशनाला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, पंतप्रधान ली केक्वियांग आणि अन्य बडे नेते उपस्थित होते. देशाच्या विकासाच्या ब्लूप्रिंटला या अधिवेशनात मान्यता देण्यात आली असून यामध्ये 60 मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चिनी कम्युनिस्ट पक्षाने मागील वर्षीच या आराखड्याला मान्यता दिली होती.

हे वाचा - आई-बापानं 'वकील' केलं, पोरानं त्यांना 'कोर्टात' नेलं; वाचा नेमकं झालं काय

खालच्या प्रवाहांवर प्रकल्प
या चौदाव्या पंचवार्षिक आढाव्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या खालच्या प्रवाहांवर अनेक धरणे उभारण्याचा चीनचा निर्धार आहे. यामुळे भारत आणि बांगलादेशला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. दरम्यान या प्रकल्पाबाबत भारताने याआधी देखील चीन सरकारकडे चिंता व्यक्त केली होती. तिबेट स्वायत्त प्रदेशाचे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे उपप्रमुख चे दाल्हा म्हणाले की, चीन सरकारने यंदाच येथे धरण बांधायला सुरुवात करावी. उत्तर तिबेटमधील नैसर्गिक वायूच्या शोधावर देखील गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ऐतिहासिक संधी साधणार?
तिबेटमधील सर्वांत शेवटचा भाग असणाऱ्या मेदॉगमध्ये धरण उभारण्याचा चीनचा विचार आहे. हा सगळा भाग अरुणाचल प्रदेशला लागून आहे. यार्लुंग झांग्बो (ब्रह्मपुत्रेचे तिबेटी नाव) नदीवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याची ही ऐतिहासिक संधी आहे. ती आपण सोडता कामा नये, असे चिनी अधिकारी आता खुलेपणाने बोलून लागले आहेत. चीनने 2015 मध्येच तिबेटमध्ये 1.5 अब्ज डॉलरचे झांग्मू हायड्रो पॉवर स्टेशन सुरू केले आहे.

loading image