Coronavirus : पंतप्रधान कोरोनाला घाबरले? जनतेत वाढला असंतोष

वृत्तसंस्था
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

कोरोनानंतर निर्माण झालेली स्थिती हाताळण्यासाठी जिनपिंग यांनी देशातील दोन क्रमांकाचे नेते ली केक्वियांग यांना पुढे केले आहे.

बीजिंग : कोरोना विषाणूंनी चीनला जबरदस्त तडाखा दिला असताना देशाचे सर्वेसर्वा बनलेले चिनी अध्यक्ष शी जिनपिंग मात्र राजकीय पटलावरून अदृश्‍य झाल्यासारखी स्थिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नववर्षाच्या प्रारंभीच जिनपिंग यांनी जोरदार भाषण ठोकत चीन कशापद्धतीने विकास करतो आहे याचा पाढाच ‘ग्रेट हॉल ऑफ दी पीपल्स’मध्ये वाचला होता. आता तेच जिनपिंग अदृश्‍य राहून यंत्रणेला आदेश देताना दिसत आहेत. 

- CoronaVirus : संकटकाळात भारत देणार चीनला मदतीचा हात

मागील सात वर्षांत जिनपिंग यांनी चीनमध्ये स्वतःची एकाधिकारशाही निर्माण केली, लोकांचाही त्यांना पाठिंबा मिळाला होता. आता कोरोनाच्या संसर्गानंतर मात्र सारे चित्र बदलले आहे. या नव्या संकटाला हाताळण्यात जिनपिंग कमी पडले, अशी लोकांची सार्वत्रिक भावना झाली आहे.

कोरोनाचा विषाणू हा सत्ताधारी पक्षाला मोठा धक्का असून, तेथील अभ्यासक हे याची तुलना तियानमेन चौकातील रक्तरंजित बंडाशी करू लागले आहेत. 

- Video : डोळ्यांत पाणी आणणारा चीनमधला व्हिडिओ; नर्सने लांबूनच घेतली मुलीची भेट​

ली केक्वियांग पुढे 

कोरोनानंतर निर्माण झालेली स्थिती हाताळण्यासाठी जिनपिंग यांनी देशातील दोन क्रमांकाचे नेते ली केक्वियांग यांना पुढे केले आहे. सद्यःस्थितीमध्ये केक्वियांग हेच सरकारचा चेहरा बनल्याचे चित्र आहे. केक्वियांग यांनी काही दिवसांपूर्वीच वुहानमधील डॉक्टरांशीही संवाद साधला होता.

- Bushfire Cricket League : तिच्या विनंतीनंतर क्रिकेटचा देव उतरला मैदानात!

कोरोनाच्या संसर्गाची पूर्वसूचना देणारे डॉक्टर ली वेनलियांग यांना स्थानिक पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागल्याची बाब उघड झाल्यानंतर मात्र लोकांचा स्थानिक प्रशासन आणि सरकारप्रतीचा रोष वाढल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China people raise the question where is Xi Jinping