Bushfire Cricket League : तिच्या विनंतीनंतर क्रिकेटचा देव उतरला मैदानात!

टीम ई-सकाळ
Sunday, 9 February 2020

इनिंग ब्रेकमध्ये एक ओव्हर खेळशील का? यामधूनही आम्ही थोडीफार मदत उभारू शकतो, अशी विनंती एलिसेने सचिनला केली होती.

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसे पेरीच्या विनंतीचा मान ठेवत क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाच वर्षांनंतर मैदानात उतरला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या वणव्यात कधीही भरून काढता येणार नाही, अशी वित्त आणि जीवितहानी झाली. ऑस्ट्रेलियाला सध्या मदतीची गरज असून अनेक हात याकामी पुढे सरसावले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्ननं आपल्या आवडत्या टोपीचा लिलाव केला करून कोट्यवधींची मदत उभारली आहे. आपत्तीग्रस्तांना मदतनिधी उभारण्यासाठी एक प्रदर्शनीय क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक जगप्रसिद्ध आजी-माजी क्रिकेटपटू सहभागी झाले होते.

- INDvsAUS : 'कॅप्टन क्वीन'ची कमाल; 'या' विक्रमाशी साधली बरोबरी!

पाँटिंग इलेव्हन आणि गिलख्रिस्ट इलेव्हन या दोन टीममध्ये बुशफायर क्रिकेट लीग मॅच पार पडली. यामध्ये पाँटिंगच्या टीमने बाजी मारली. सचिन पाँटिंगच्या टीमचा कोच म्हणून यामध्ये सहभागी झाला होता. यावेळी इनिंग ब्रेकमध्ये त्याने बॅटिंगही केली. एलिसेने सचिनला बॉलिंग करताना सचिनने पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर दोन रन काढल्यावर उरलेली ओव्हर त्याने खेळून काढली. 

पाँटिंग इलेव्हनमध्ये ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर, मॅथ्यू हेडन, रिकी पाँटिंग, ब्रायन लारा, ब्रेट ली या स्टार खेळाडूंचा भरणा होता. तर गिलख्रिस्ट इलेव्हनमध्ये कर्टनी वॉल्श, अॅण्ड्रू सायमंड्स, भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग, शेन वॉटसन, अॅडम गिलख्रिस्ट हे स्टार प्लेअर होते. पहिल्यांदा बॅटिंग करताना पाँटिंग इलेव्हनने 10 ओव्हरमध्ये 104 रन्स ठोकल्या. आणि गिलख्रिस्ट इलेव्हनपुढे विजयासाठी 105 रन्सचे टार्गेट ठेवले.  

- INDvsNZ : जिंकता जिंकता हरला; पण जडेजाने कपिल देव अन् धोनीचा 'तो' विक्रम मोडला!

इतक्या दिवसांनंतर जुन्याच फॉर्ममध्ये परतलेल्या गिलख्रिस्टने त्याच्या स्टाईलमध्ये तुफानी सुरवात केली. आणि पहिल्या विकेटसाठी 49 रन्सची पार्टनरशिप केली. मात्र, दुखापतीमुळे वॉटसन माघारी परतला. त्यानंतर ब्रेट लीने ब्रॅड हॉज आणि युवराज सिंगला बाद करत सामना वळवला. शेवटी सायमंडने मोठे फटके मारले, पण नेत्रदीपक झालेल्या या मॅचमध्ये पाँटिंगच्या टीमने एका रनने विजय मिळवला. 

- U19CWC : टीम इंडियाचा नवा स्टार; जैस्वालची वर्ल्डकपमधील 'यशस्वी' कामगिरी पाहिली का?

एलिसेची विनंती

चॅरिटी उभारण्यासाठी आयोजित केलेल्या या मॅचमध्ये तू खेळत आहेस याचा आनंद आहे. पाँटिंगच्या टीमचा तू कोच म्हणून यात सहभागी झाला असला तरी या मॅचमध्ये तू बॅटिंग करावी. इनिंग ब्रेकमध्ये एक ओव्हर खेळशील का? यामधूनही आम्ही थोडीफार मदत उभारू शकतो, अशी विनंती एलिसेने सचिनला केली होती. आणि तिच्या या विनंतीला मान देत सचिनही मैदानात उतरला. 

सचिनने क्रिकेटपासून दूर राहावे, असा सल्ला

एलिसेच्या विनंतीनंतर सचिन बॅटिंग करणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. मात्र, त्याला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. ही गोष्ट त्याने बोलूनही दाखवली होती. पण ही संकल्पना आवडल्याने ग्राउंडवर उतरत सचिन खेळलाही. या मॅचमधून आपण पुरेसा निधी उभारू असे ट्विटही त्याने केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ellyse Perry bowl to Sachin Tendulkar in Bushfire Bash charity match