esakal | चीनमध्ये कोरोना आता नावालाच; दिवसभरात सापडले 11 रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

china

चीनमध्ये कोरोना आता नावालाच; दिवसभरात सापडले 11 रुग्ण

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

बिजिंग- कधीकाळी कोरोना महामारीने थैमान घातलेल्या चीनमध्ये आता स्थिती नियंत्रणात आली आहे. चीनमध्ये 15 एप्रिलला 11 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एकादिवसापूर्वी देशात 10 रुग्ण सापडले होते. राष्ट्रीय आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, नव्याने सापडलेले कोरोना रुग्ण युनान प्रातातीत दक्षिण-पश्चिम भागातील आहेत. चीनमध्ये रुग्णांची संख्या 15 वरुन 31 पर्यंत वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात सापडलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 90,468 झाली आहे. मृत्यांची संख्या 4,636 असून गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही.

4 एप्रिलला चीनमध्ये दोन महिन्यातील सर्वाधित रुग्ण आढळले होते. या दिवशी 32 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यातील 15 रुग्ण स्थानिक होते, तर इतर म्यानमारला लागू असलेल्या रुईली शहरातील होते. चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाला आहे. शिवाय देशात कोरोना विषाणूमुळे गेल्या काही दिवसांत एकही मृत्यू झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: भारताचे चीन-पाकसोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता; US गुप्तचर विभागाचा दावा

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने अक्षरक्ष: थैमान घातले. 2019 च्या डिसेंबर महिन्यात चीनमध्ये पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर चीनच्या या विषाणूने जगभरात आपले हातपाय पसरले. सुरुवातीच्या काळात विषाणूने चीनमध्ये हाहाकार माजवला. पक्षांमधून किंवा कच्चा मासांच्या सेवनातून विषाणू माणसामध्ये आल्याचं बोललं जातं. चीनने कोरोना महामारीवर मात करण्यासाठी देशात कठोर निर्बंध लादले होते. त्यानंतर चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा: भारत-चीन  पाडू या अविश्वासाची भिंत!

दरम्यान, अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहे. भारतामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बहुताश: देशांमध्ये अशीच परिस्थिती आहे. पण, चीनमध्ये मात्र अगदी उलट चित्र दिसून आलं. कारण, चीनमध्ये पुन्हा रुग्ण संख्या वाढली नाही. तेथे कोरोना नियंत्रणात आहे. चीनने कोरोना आकडेवारी लपवली असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.