Bird Flu Virus : कोरोना कमी होत असतानाच चीननं वाढवलं जगाचं टेन्शन; 'या' नव्या विषाणूनं घेतला पहिला बळी!

कोरोनानंतर आता चीनमध्ये एका नव्या विषाणूनं कहर सुरू केलाय.
H3N8 Bird Flu Virus
H3N8 Bird Flu Virusesakal
Summary

2022 मध्ये प्रथमच मानवांमध्ये H3N8 विषाणू पसरल्याची पुष्टी झाली. याला 'एशियाटिक फ्लू' किंवा 'रशियन फ्लू' असंही म्हणतात.

बीजिंग : कोरोनानंतर आता चीनमध्ये एका नव्या विषाणूनं कहर सुरू केलाय. इथं H3N8 नावाच्या बर्ड फ्लूच्या (Bird flu) विषाणूमुळं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

चीनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण चीनच्या झोंगशान शहरातील 56 वर्षीय महिलेला H3N8 बर्ड फ्लूची लागण झाली आणि सोमवारी तिचा मृत्यू झाला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, H3N8 एव्हीयन इन्फ्लूएंझामुळं (H3N8 Avian Influenza) झालेला हा पहिला मानवी मृत्यू आहे. गेल्या वर्षी मानवांमध्ये या संसर्गाची आणखी दोन प्रकरणं नोंदवली गेली. गंभीर निमोनिया आजारामुळं महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नंतर तिचा मृत्यू झाला. तिला मायलोमासह (कर्करोग) अनेक आरोग्य समस्या होत्या.

H3N8 Bird Flu Virus
Nirmala Sitharaman: मुस्लिमांबाबत अर्थमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; सीतारामन म्हणाल्या, मुस्लिमांची स्थिती पाकिस्तानपेक्षा..

H3N8 फ्लूचा विषाणू सामान्यतः पक्ष्यांमध्ये आढळतो. चीनमध्ये नोंदवलेलं नवीन प्रकरण हे मानवांमध्ये संसर्गाचं तिसरं प्रकरण आहे. तर, प्रौढ व्यक्तीला संसर्ग झाल्याचं हे पहिलं प्रकरण आहे. या विषाणूमुळं पहिल्यांदाच एखाद्याचा मृत्यू झाला आहे. 2022 मध्ये प्रथमच मानवांमध्ये H3N8 विषाणू पसरल्याची पुष्टी झाली. याला 'एशियाटिक फ्लू' किंवा 'रशियन फ्लू' असंही म्हणतात.

H3N8 Bird Flu Virus
Sonia Gandhi : बळजबरीनं गप्प बसून देशाचे प्रश्न सुटणार नाहीत; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com