अल्ट्रामॅरेथॉनमध्ये 21 धावपटूंचा मृत्यू; 27 अधिकाऱ्यांना चीन देणार शिक्षा

अल्ट्रामॅरेथॉनमध्ये 21 धावपटूंचा मृत्यू; 27 अधिकाऱ्यांना चीन देणार शिक्षा
Summary

डोंगराळ प्रदेशात 100 किलोमीटर अल्ट्रामॅरेथॉनचे आयोजन केलं होतं. प्रचंड पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे या मॅरेथॉनवेळी 21 जणांचा मृत्यू झाला होता.

बिजिंग - चीनमध्ये गेल्या महिन्यात गासु प्रांतात बिगर व्यावसायिक अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये तब्बल 21 धावपटूंचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी नगरपालिकेच्या अनेक सरकारी अधिकाऱ्यांसह 27 जणांना शिक्षा होणार आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. चीनच्या उत्तर पश्चिम प्रांतातील गासुच्या डोंगराळ प्रदेशात 22 मे रोजी 100 किलोमीटर अल्ट्रामॅरेथॉनचे आयोजन केलं होतं. प्रचंड पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे या मॅरेथॉनवेळी 21 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दिग्गज धावपट्टू लियांग जिंग यांचाही समावेश होता.

दरम्यान, अल्ट्रामॅरेथॉनच्या चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अल्ट्रामॅरेथॉनचे आयोजनावेळी अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे. बिगर व्यावसायिक पद्धतीने स्पर्धा भरवली होती, त्यामुळे इतक्या धावपटूंचा मृत्यू झाला असंही अधिकाऱ्याने म्हटलं.

अल्ट्रामॅरेथॉनमध्ये 21 धावपटूंचा मृत्यू; 27 अधिकाऱ्यांना चीन देणार शिक्षा
Inspiring Journey : दहावी नापास रिक्षावाला पोहोचला स्वित्झर्लंडला

अल्ट्रामॅरेथॉनमध्ये 172 जणांनी सहभाग घेतला होता. यापैकी 151 जण सुरक्षित होते तर आठ जण जखमी झाले होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अल्ट्रामॅरेथॉनमध्ये भाग घेतलेल्यांमध्ये सर्वाधिक स्पर्धक हे टी शर्ट आणि शॉर्ट घालून आले होते.

सरकारी वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, बैयिनमध्ये सत्तारुढ सीपीसीचे सचिव सू जून आणि महापौरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापौरांनी या घटनेनंतर स्पर्धेचा आयोजक म्हणून आपली चूक मान्य केली होती. चीनमध्ये या प्रकारानंतर सोशल मीडियावरून संताप व्यक्त करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com