esakal | भूमिगत अण्वस्त्र केंद्रांसाठी चीनचा डाव

बोलून बातमी शोधा

Nuclear-weapons-center}

अत्याधुनिक अण्वस्त्रे तयार करून त्यांची भूमिगत केंद्रांवरून चाचणी घेण्याची क्षमता विकसीत करण्यासाठी चीनचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याचा दावा अमेरिकेतील एका तज्ज्ञाने केला आहे. यासाठी त्याने उपग्रहांकडून मिळालेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला.

global
भूमिगत अण्वस्त्र केंद्रांसाठी चीनचा डाव
sakal_logo
By
पीटीआय

उपग्रह छायाचित्रांच्या अभ्यासातून अमेरिकी तज्ज्ञाचा अंदाज 
वॉशिंग्टन - अत्याधुनिक अण्वस्त्रे तयार करून त्यांची भूमिगत केंद्रांवरून चाचणी घेण्याची क्षमता विकसीत करण्यासाठी चीनचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याचा दावा अमेरिकेतील एका तज्ज्ञाने केला आहे. यासाठी त्याने उपग्रहांकडून मिळालेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला. संभाव्य अण्वस्त्र हल्ल्याला तोंड देण्यासाठी चीनने ही तयारी सुरु केल्याचा दावा करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हान्स क्रिस्टन्सन हे अनेक वर्षांपासून अमेरिका, रशिया आणि चीनच्या आण्विक क्षमतांचा अभ्यास करत आहेत. चीनमधील क्षेपणास्त्र प्रशिक्षण तळाच्या उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे त्यांनी चीनबाबत अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार, चीनला अमेरिकेपासून मोठा धोका वाटत आहे. चीनने लष्कराचे आधुनिकीकरण करण्यास सुरुवात केल्यापासून अमेरिकेने आगामी दोन दशकांचा विचार करत अत्याधुनिक अण्वस्त्रे निर्मितीसाठी प्रचंड मोठी गुंतवणूक केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून चीननेही अण्वस्त्र क्षमता वाढविण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याचे दिसते. 

सर्जरीवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टात हजर झाला डॉक्टर; जाणून घ्या, पुढं काय झालं?

सध्या तरी या दोन देशांमध्ये कोणताही साध्या पातळीवरचाही लष्करी संघर्ष होण्यासारखी स्थिती नाही. मात्र, त्यांच्यातील राजकीय तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हाँगकाँग, तैवान आणि दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या वर्चस्वाविरोधात चीनने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना आळा घालण्यासाठीही चीनने ही चाल रचली असल्याचा अंदाज बांधला जात आहे. अमेरिका सरकारने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.  

विविध संस्थांच्या अहवालानुसार, चीनकडे सध्या दोनशेच्या आसपास अण्वस्त्रे आहेत. अमेरिका आणि रशियाकडे साडे पाच हजारांहून अधिक अण्वस्त्रे आहेत. या दोघांच्या तुलनेत चीनकडील अण्वस्त्रांची संख्या अत्यल्प असली तरी येत्या काही वर्षांमध्ये ती वेगाने वाढविण्याचा त्यांचा इरादा असल्याचे क्रिस्टन्सन यांनी म्हटले आहे. 

मुंबईतील 'ब्लॅकआऊट'मागे चिनी कनेक्शन; अमेरिकेतील कंपनीचा धक्कादायक दावा

छायाचित्रांमधून काय दिसते?
चीनने त्यांच्या उत्तर भागात जिलानताई येथील क्षेपणास्त्र प्रशिक्षण तळावर अनेक भूमिगत केंद्र बांधण्यास नुकतीच सुरुवात केल्याचे उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांमधून दिसत आहे. याशिवाय पाच भूमिगत केंद्रांचे बांधकामही काही महिने आधी सुरु झाले आहे. अशा प्रकारच्या १८ ते २० भूमिगत केंद्रांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अर्थात, चीनने या केंद्रांची संख्या दुप्पट किंवा तिप्पट वाढविली तरी ते अमेरिकेच्या जवळपास जाऊ शकत नाहीत. अमेरिकेच्या हवाई दलाकडे अशी ४५० भूमिगत केंद्र असून त्यातील ४०० केंद्र पूर्ण क्षमतेने सज्ज आहेत. रशियाकडेही १३० भूमिगत केंद्र आहेत.

Edited By - Prashant Patil