esakal | मुंबईतील 'ब्लॅकआऊट'मागे चिनी कनेक्शन; अमेरिकेतील कंपनीचा धक्कादायक दावा

बोलून बातमी शोधा

china}

लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान चीन आपल्या हॅकर्सच्या मदतीने भारतात ब्लॅक आऊट करण्याच्या तयारीत होता.

मुंबईतील 'ब्लॅकआऊट'मागे चिनी कनेक्शन; अमेरिकेतील कंपनीचा धक्कादायक दावा
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान चीन आपल्या हॅकर्सच्या मदतीने भारतात ब्लॅक आऊट करण्याच्या तयारीत होता. अमेरिकीची वृत्त संस्था न्यूयॉर्क टाईम्सने एका स्टडीचा हवाला देत दावा केलाय की, चीनच्या हॅकर्स सैन्याने ऑक्टोबरमध्ये केवळ पाच दिवसांमध्ये भारतात पॉवर ग्रीड, आयटी कंपन्या आणि बँकिंग सेक्टर्सवर 40500 वेळा हल्ला केला. एका स्टडीमध्ये सांगण्यात आलंय की, जून महिन्यात झालेल्या गलवान खोऱ्याातील झडपेच्या चार महिन्यानंतर 12 ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या ब्लॅक आऊट मागे चीनचा हात होता. 

चिनी सायबर हल्ल्यामुळे गेली मुंबईची वीज?

भारताविरोधात पॉवर ग्रीडविरोधात एका व्यापक रणनीती अंतर्गत चीनने सायबर हल्ल्यामुळे केला होता. चीन दाखवू पाहत होता की, सीमेवर त्यांच्या विरोधात कारवाई केली तर ते भारतातील वेगवेगळ्या पॉवर ग्रीडवर मालवेयर हल्ला करुन त्यांना बंद करु शकते. या अभ्यासात असंही सांगण्यात आलंय की, चिनी मालवेयर भारतातील वीज पुरवठा नियंत्रित करणाऱ्या प्रणालीमध्ये घुसला होता. यामध्ये हाय वोल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन आणि थर्मल प्लँट यांचाही समावेश होता. 

'भारत आणि पाकिस्तान खरे मित्र झालेलं पहायचंय'; नोबेलप्राप्त मलालाने...

अमेरिकेच्या सायबर सेक्युरेटी कंपनीचा दावा

अमेरिकेची सायबर सेक्युरेटी कंपनी रिकॉर्डेड फ्युचरच्या (Recorded Future)  रिपोर्टनुसार भारताच्या वीज पुरवठा लाईनमध्ये चीनच्या व्हायरसने घुसखोरी केली होती. ही कंपनी सरकारी एजेन्सीसोबत मिळून इंटरनेटसंबंधी अभ्यास करते. असे असले तरी रिकॉर्डेड फ्युचर भारताच्या पॉवर सिस्टममध्ये पोहोचू शकत नव्हती, त्यामुळे याचा पुढील तपास करु शकलेली नाही. 

पॉवर ग्रीड आणि ट्रान्समिशन लाईनमध्ये चिनी हॅकर्सची घुसखोरी

रिकॉर्डेड फ्यूचरचे प्रमुख ऑपरेटिंग ऑफिसर स्टुअर्ट सोलोमन यांनी सांगितलं की, चीनच्या सरकारी एजेन्सीच्या रेड इको नावाच्या एका कंपनीने भारताच्या अनेक पॉवर जनरेशन आणि ट्रान्समिशन लाईनमध्ये घुसखोरी केली होती. यासाठी सायबर हॅकिंग तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात आला होता. याचवेळी मुंबईतील पॉवर ग्रीडचा वीज पुरवठा खंडित झाला होता. पण, यामागे सायबर हल्ला आहे की दुसरं काही हे सिद्ध करता आलं नाही. 

म्यानमारमध्ये 'रक्तरंजित' रविवार; लष्कराने केलेल्या गोळीबारात 18...

12 ऑक्टोंबरमध्ये काय झालं होतं मुंबईत?

12 ऑक्टोंबर 2020 मध्ये सकाळी मुंबईतील वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. कधीच न थांबणारी मुंबई या दिवशी थांबली. वीज गेल्यामुळे कोरोनाशी लढणाऱ्या हॉस्पिटलमधील वेंटिलेटर्संनी काम करणं बंद केलं. ऑफिसमधील वीज गेली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरळीत होऊ शकला होता.