esakal | चीनचा दावा; सर्वसमावेशक राजकीय यंत्रणेची तालिबाकडून अपेक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

President-Xi-Jinping

चीनचा दावा; सर्वसमावेशक राजकीय यंत्रणेची तालिबाकडून अपेक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीजिंग (पीटीआय) : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने हंगामी सरकार स्थापन केले असल्याने या देशातील अराजकता आता संपली असल्याचा दावा चीनने केला आहे. सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी ही कृती आवश्‍यक होती, असे सांगतानाच, तालिबानने सर्वसमावेशक राजकीय यंत्रणा निर्माण करावी, अशी अपेक्षाही चीनने व्यक्त केली.

हेही वाचा: पाककडून ‘हिंसाचाराच्या संस्कृती’ला खतपाणी; आमसभेत भारताची टीका

तालिबानने काल (ता. ७) हंगामी सरकारची घोषणा केली. मुल्ला महंमद हसन अखुंद याच्याकडे पंतप्रधानपद सोविण्यात आले आहे. मंत्रिमंडळातील अनेक जणांच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश आहे. याबाबत प्रश्‍न विचारला असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन म्हणाले की, ‘‘सरकार स्थापन झाले हेच आमच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. या सरकार स्थापनेमुळे अफगाणिस्तानातील अराजकता संपली असून सामाजिक आणि आर्थिक घडी बसविण्यासाठी हे आवश्‍यकच होते. तसेच, देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणात मवाळपणा आणावा, सर्व दहशतवादी कारवाया सोडून द्याव्या, इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करावेत.’’ तालिबान सरकारला चीनकडून मान्यता मिळेल का, असा प्रश्‍न विचारला असता वेनबिन यांनी थेट उत्तर दिले नाही.

हेही वाचा: रशियाच्या मंत्र्याचे निधन; कॅमेरामनला वाचवताना दुर्घटना

तालिबानकडून महिलांना मारहाण

काबूल : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या अस्थिरतेत खतपाणी घातले जात असल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. त्यामुळे काल ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. काबूलमध्ये आंदोलन करणाऱ्या महिलांना हुसकावून लावताना तालिबानने हवेत गोळीबार केला. यादरम्यान तालिबानकडून रस्त्यावर उतरलेल्या महिलांना निर्दयतेने मारहाण होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तालिबानचा दहशतवादी पट्ट्याने महिलांना मारहाण करत असल्याचे दिसते. मारहाणीचा व्हिडिओ एका महिलेने शेअर केला आहे. यात म्हटले की, काबूलमध्ये आंदोलन करणाऱ्या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. तालिबानचा एक कमांडर हातात बेल्ट घेऊन महिलांना मारहाण करत असल्याचे दिसते. तो जोरात मारहाण करत असताना अनेक महिलांनी त्यास विरोध केला. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी महिला धावपळ करताना दिसतात. अनेक महिला रडत असल्याचा आवाज ऐकू येते.चीनचा दावा; सर्वसमावेशक राजकीय यंत्रणेची तालिबाकडून अपेक्षा

loading image
go to top