इराणच्या अण्वस्त्र करारास चीनचा जाहीर पाठिंबा

यूएनआय
Monday, 12 October 2020

चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री महंमद जावेद झरीफ यांची चीनच्या वायव्येकडील तेंगचोंग शहरात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अशी ग्वाही दिली. येमेनमधील युद्धावरून सौदी अरेबिया आणि मध्य पूर्वेतील इतर बलाढ्य देशांशी इराणचे संबंध ताणले गेले आहेत. यासंदर्भात चीनने वेगळीच भूमिका घेतली.

बीजिंग - चीनने इराणला ठामपणे जाहीर पाठिंबा दिला असून अण्वस्त्र कराराबाबतही हीच भूमिका घेतली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री महंमद जावेद झरीफ यांची चीनच्या वायव्येकडील तेंगचोंग शहरात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अशी ग्वाही दिली. येमेनमधील युद्धावरून सौदी अरेबिया आणि मध्य पूर्वेतील इतर बलाढ्य देशांशी इराणचे संबंध ताणले गेले आहेत. यासंदर्भात चीनने वेगळीच भूमिका घेतली. मध्य पूर्वेतील तणाव नष्ट करण्यासाठी नव्या व्यासपीठाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

मोदी सरकारची तत्परता; लीबियातून अपहरण झालेल्या 7 भारतीयांची सुखरुप सुटका

ते म्हणाले की, विभागीय पातळीवर बहुस्तरीय संवाद व्हावा. त्यात सर्व संबंधित घटकांना समान संधी मिळावी असा आमचा प्रस्ताव आहे. त्यातून राजकीय, राजनैनिक पर्यायांपासून सुरक्षेच्या समस्यांवर मार्ग निघतील, असे वँग यी यांनी नमूद केले. झरीफ यांनी ही चर्चा फलदायी झाल्याचे सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinas public support for Irans nuclear deal