चीनच्या तज्ज्ञांनी केला दावा; अन्‍य देशांच्‍या लसीपेक्षा या औषध कंपनीची लस प्रभावी; वाचा सविस्तर

वृत्तसंस्था
Friday, 24 July 2020

चीनचे सैन्य दल आणि ‘कॅनसिनो बायोलॉजिक्स’ या औषध कंपनीने कोरोनावरील लस विकसित केली असून अन्‍य देशांच्‍या लसीपेक्षा ही लस प्रभावी असल्याचा दावा चीनचे तज्ज्ञ करीत आहेत.

बीजिंग - चीनचे सैन्य दल आणि ‘कॅनसिनो बायोलॉजिक्स’ या औषध कंपनीने कोरोनावरील लस विकसित केली असून अन्‍य देशांच्‍या लसीपेक्षा ही लस प्रभावी असल्याचा दावा चीनचे तज्ज्ञ करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेतील ‘मॉर्डना आयएनसी’ आणि ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी ठरली असून चीनची लस दुसऱ्या टप्प्यातील चाचणी परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. ऑक्सफर्डच्या लसीचे उत्पादन भारतामधील सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे. ही लस सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्यानंतर भारतात ती लवकर उपलब्ध होऊ शकेल.

आई-वडीलांना मारलेल्या दोन दहशतवाद्यांचा या चिमुरडीने केला खातमा

‘ग्लोबल टाइम्‍स’शी बोलताना लसतज्ज्ञ ताओ लीना म्हणाले की, एका लसीतून औषधाची कमी मात्रा दिली तरी प्रतिकारशक्तीबाबत चांगला प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे अमेरिकेतील ‘एमआरएनए’ (mRNA) आणि ऑक्सफर्डची लस दोनदा दिल्यानंतर प्रतिकारशक्तीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

ग्रीन कार्डसाठी भारतीयांच्या प्रतिक्षा यादीने केला पुढील १९५ वर्षांचा कोटा पूर्ण

दोनदा लस देण्यामध्ये तीन-चार आठवड्यांचा कालावधी जाणे आवश्‍यक ठरते. म्हणजेच चीनची लस उत्पादन क्षमता अन्य दोन देशांपेक्षा दुप्पट होऊ शकते. यातून कोरोनाचा फैलाव अधिक चांगल्या पद्धतीने रोखला जाऊ शकेल, असे ताओ म्हणाले.

कोरोना लसीची मानवावरील दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत ‘कॅनसिनो’ची ‘एडी५-एनसीओव्ही’ (Ad5-nCOV) ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळले आहे. ही लस दिल्यानंतर संबंधित स्वयंसेवकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese experts claim vaccine of pharmaceutical company is more effective than other countries