चीनी उत्पादनावर बहिष्काराच्या आवाहनामुळे चीन सरकार चिंतीत; चीनी सरकारच्या अधिकृत मुखपत्रातून मांडली भूमिका 

चीनी उत्पादनावर बहिष्काराच्या आवाहनामुळे चीन सरकार चिंतीत; चीनी सरकारच्या अधिकृत मुखपत्रातून मांडली भूमिका 

मुंबई : गलवान खोऱ्यात भारत-चीनमधील संघर्षात भारताचे 20 जवान शहिद झालेत. या घटनेनंतर  संपुर्ण देशभरात चीनविरुध्द संतप्त वातावरण आहे. चीनी व्यापारावर बंधने आणण्याची मागणी होत आहे. तर अनेक व्यापारी संघटनांनी चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ या वृत्तपत्रात या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून, सिमावादात अर्थकारण आणणे हे  घातक ठरेल असा इशारा या वर्तमानपत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

भारत-चीन सिमावादानंतर देशभरात चीनविरोधातील भावना प्रबळ आहेत. स्वदेशी जागरण मंचाने चीनच्या वस्तूंवर आणि व्यापारावर अंकुश आणण्याची मागणी केली आहे. भारतीय दूरसंचार विभागाने चीनी कंपनीचे कंत्राटही रद्द केले आहे. अनेक भारतीय व्यापाऱ्यांनी चीनी उत्पादनावर बहिष्कार घातला आहे. सेलिब्रिटींनी चीनी वस्तूंच्या जाहिराती करु नये अशा आशयाचे पोस्ट समाजमाध्यमांवर वायरल होत आहेत. त्याला काही सेलिब्रिटींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या सर्व प्रकारामुळे चीनच्या पोटात खदखद सुरु झाली असून, चीनला आर्थिक नुकसान होण्याची भिती सतावत आहे.

‘ग्लोबल टाईम्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये सिमावादात व्यापार, गुंतवणूक अर्थकारण आणणे चूक असल्याची तक्रार केली आहे. आशिया खंडातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताकडून ही अपेक्षा नाही. त्यामुळे चीनविरोधी जनमानस भडकवणाऱ्या या मंडळीना आवर घालावा. असा इशाराही या लेखाच्या माध्यमातून दिला गेला.

सध्या भारत जगातील तिसरा मोठा कोरोना बाधित देश आहे. लॉकडाऊनमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नूकसान झाले, कोट्यवधी लोकांनी आपले रोजगार गमावले याची आठवणही  या लेखाच्या माध्यमातून करुन दिली आहे. या कठिण काळात आर्थिक संधी गमावणे हे दोन्ही देशांसाठी योग्य ठरणार नाही. कोरोना संसर्गामुळे जगभरात परदेशी गुंतवणूकीत 40 टक्के घट होणार आहे. तर विकसनशील देशामध्ये परदेशी गुंतवणूक 45 टक्याने कमी होण्याचा धोका आहे. ही बाब भारताने समजून घ्यावी असंही या लेखात म्हटले आहे.

या परिस्थितीत भारत-चीनमध्ये सिमा वाद भडकला तर उद्योजक उरली सुरली गुंतवणूक काढून घेतील. तशीही भारताच्या निर्यातीत सातत्याने घट होत आहे. या परिस्थितीत चीनी व्यापारास अडथळे आणल्यास दोन्ही देशामधील वाद अजून पेटेल असा इशाराही या लेखातून दिला गेला आहे.

chinese government is worried about the call for a boycott on Chinese products

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com