Video: 'प्रेमळ पती'ने गरोदर पत्नीसाठी केली पाठीची खुर्ची...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

'प्रेमळ पती'ने गरोदर पत्नीसाठी पाठीची खुर्ची केली. पती खाली बसला आणि पत्नीला पाठीवर बसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बीजिंग: 'प्रेमळ पती'ने गरोदर पत्नीसाठी पाठीची खुर्ची केली. पती खाली बसला आणि पत्नीला पाठीवर बसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ पोलिसांनी व्हायरल केला असून, त्या पतीला 'प्रेमळ पती'ची पदवी दिली. यामुळे सोशल मीडियावर 'प्रेमळ पती' चर्चेत आला आहे.

पती-पत्नीचा व्हिडिओ एका रुग्णालयामधील आहे. दोघे एका रूग्णालयात गेले होते. परंतु, त्यांना थांबायला सांगण्यात आले होते. रुग्णालयाच्या वरांड्यामधील सर्व बाकडी भरलेली होती. गर्भवती महिलेला बसायला जागा नव्हती. शिवाय, पतीने अनेकांना विनंती करूनही बसायला जागा दिली नाही. गर्भवती महिला उभी राहून कंटाळली होती. शिवाय, तिला खालीही बसता येत नव्हते. पत्नीची अवस्था पाहून पती मांडी घालून भिंतीच्या बाजूला बसला आणि पुढे वाकला. यानंतर त्याची गर्भवती पत्नी त्याच्या पाठीवर बसली. पत्नीला त्याने पाणी पिण्यास दिले. पती खाली मान घालून बसला होता व त्याच्या पाठीवर गर्भवती पत्नी बराच वेळ बसली होती. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

प्रियकराचे नशीबच जोरात; सगळीकडून मालामाल...

पती-पत्नीचा व्हिडिओ हेगँग पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पोलिसांनी या नवऱ्याला 'प्रेमळ पती' अशी पदवी दिली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पतीचे अनेकजण कौतुक करत आहेत.

'त्या'वेळी पत्नी प्रियकराच्या कुशीत होती...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinese man is winning hearts for becoming a chair in hospital so pregnant wife could sit