लडाखमध्ये चिनी सैनिक पडले आजारी; फिंगर 4 वरून न्यावे लागतायत रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

मागच्या दोन ते तीन दिवसात फिंगर फोर जवळच्या उंचावरील क्षेत्रात तैनात असलेल्या चिनी सैनिकांना फिंगर सहाजवळ उभारण्यात आलेल्या दवाखान्यात नेण्यात आल्याची माहिती एका लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या भारत आणि चीनमधील सीमारषेवर गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशातील सैन्य तिथे मोठ्या प्रमाणावर तैनात असून चीनच्या कुरापतींना रोखण्याचे काम भारतीय लष्कर करत आहे. परंतु, या ठिकाणी असलेल्या प्रतिकूल हवामानाचा विपरित परिणाम सैन्यावर होण्याची शक्यता आहे. मागच्या दोन ते तीन दिवसात फिंगर फोर जवळच्या उंचावरील क्षेत्रात तैनात असलेल्या चिनी सैनिकांना फिंगर सहाजवळ उभारण्यात आलेल्या दवाखान्यात नेण्यात आल्याची माहिती एका लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

हेही वाचा - 'या' लशीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; साईड इफेक्ट होत असल्याची तक्रार

पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजेच चीनी सैन्यांमधील सैनिकांची तब्येत बिघडत आहे, अशी माहिती समोर आली आहे. तिथले हवामान हे अत्यंत थंड बनत चालले असून तापमान हे वजा 50 डिग्रीपर्यंत जाऊ शकते. या सर्व घटनांशी निगडित असणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चीनी सैनिकांना अतिउंच जागेवर गेल्यावर निर्माण होणाऱ्या आरोग्यासंबधीच्या अडचणीमुळे पँगाँग त्सो सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर फिंगर एरियाजवळील उंच मैदानातील दवाखान्यात चीनी सैनिकांना भरती केले गेले आहे.  फिंगर 4 मधून फिंगर 6 मध्ये असलेल्या एका दवाखान्यात त्यांच्यानर उपचार सुरु आहेत. 

पुर्व लडाखमध्ये कडक थंडीचे वातावरण बनत आहे. आणि अशा परिस्थितीत दोन्ही देशाचे सैन्य हे अतिउंच भागात आहे. दोन्ही सैन्यातील सैनिकांना या अडचणीचा सामना करावा लागणारे. 

हेही वाचा - पंधरा कोटीहून अधिक मुले गरिबीच्या गर्तेत; लॉकडाउनमुळे स्थिती आणखीच बिघडली

इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 16 ते 17 हजार फूट उंचीवर असलेल्या भारतीय आणि चीनी सैन्याला आरोग्यासंबधी अडचणी येऊ शकतात. आता सध्या तरी एकदम कडक थंडी नाहीये. परंतु, येणाऱ्या काही आठवड्यात आणि महिन्यांमध्ये परिस्थिती आणखीनच बिघडू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese soldiers fall ill Ladakh taken to hospital finger 4