Pakistan coal Mine: पाकिस्तानमध्ये स्फोटामुळे कोसळली कोळसा खाण, 12 कामगारांचा मृत्यू

coal Mine: पाकिस्तानमध्ये गॅस निर्मितीमुळे होणारे अपघात सामान्य आहेत. सुरक्षा उपकरणांचा अभाव आणि कामाची खराब परिस्थिती ही वारंवार अपघातांची मुख्य कारणे असल्याची कामगारांची तक्रार आहे.
Mine
Mineesakal
Updated on

Pakistan coal Mine Accident:

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये एका शक्तिशाली स्फोटामुळे कोळशाची खाण कोसळून किमान १२ जणांचा मृत्यू झाला, तर आठ जणांना वाचवण्यात यश आले.

हरनई जिल्ह्यातील हरदालो भागात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात झाला तेव्हा खाणीत 20 मजूर काम करत होते.

बलुचिस्तानचे मुख्य खाण निरीक्षक असलेल्या अब्दुल गनी बलोच यांनी बुधवारी सकाळी बचावकार्य पूर्ण झाल्याचे सांगितले की, काल रात्री मिथेन वायूचा स्फोट झाला तेव्हा खाणीत 20 कामगार काम करत होते. बचाव पथकाला खाणीत 12 मृतदेह सापडले, तर जखमी झालेल्या आठ जणांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

Mine
Bus Accident In China: बस बोगद्याच्या भिंतीला धडकल्याने 14 ठार, 37 जखमी; चीनमध्ये घडली घटना

बलोच म्हणाले की, या अपघातानंतर लगेचच रात्री दोन मृतदेह सापडले, तर बुधवारी पहाटे 10 मृतदेह सापडले. खाण महासंचालक अब्दुल्ला शाहवानी यांनीही मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, पंतप्रधान शहवाज शरीफ यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत जखमींना शक्य ती सर्व मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

पाकिस्तानच्या कोळसा उत्पादनात बलुचिस्तान प्रांताचा वाटा ५० टक्के आहे. तथापि, पाकिस्तानमध्ये गॅस निर्मितीमुळे होणारे अपघात सामान्य आहेत. सुरक्षा उपकरणांचा अभाव आणि कामाची खराब परिस्थिती ही वारंवार अपघातांची मुख्य कारणे असल्याची कामगारांची तक्रार आहे.

Mine
16 महिन्याच्या मुलीला घरी एकटं सोडलं अन् 10 दिवस सुट्टीला गेली; आईला कोर्टाने सुनावली जन्मठेप

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बलुचिस्तानमधील डुकी कोळसा क्षेत्रामध्ये एका खाजगी खाणीला लागलेल्या आगीत दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता आणि तीन जण जखमी झाले होते.

त्याचवेळी, सप्टेंबरमध्ये सिंधमधील जामशोरो येथे कोळसा खाण कोसळल्याने तीन मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. तर 2022 मध्ये, हरनाई जिल्ह्यात कोळसा खाणीत गॅस स्फोटात सहा खाण कामगार ठार झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com