

China Coal Mine Explosion
ESakal
चीनच्या शांक्सी प्रांतातील एका मोठ्या कोळसा खाण दुर्घटनेत ९० जणांचा बळी गेला असून नऊ जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या दशकातील चीनमधील ही सर्वात भीषण कोळसा खाण दुर्घटना असल्याचे मानले जात आहे. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीनुसार, राजधानी बीजिंगपासून सुमारे ५२० किमी अंतरावर असलेल्या शांक्सी प्रांतातील किनयुआन काउंटीमधील एका कोळसा खाणीत शुक्रवारी हा स्फोट झाला.