
Texas Indian Person Murder Viral Video
ESakal
जगात अनेक घटना घडतात, पण काही इतक्या भयानक असतात की त्या माणसाचे मन हेलावून टाकतात. अमेरिकेतील टेक्सासमधील डलास येथून असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. भारतीय वंशाचे ५० वर्षीय चंद्रा मौली नागमल्लैया, ज्यांना मित्र आणि कुटुंबीय प्रेमाने "बॉब" म्हणत असत. त्यांची पत्नी आणि मुलासमोर हत्या करण्यात आली. या घटनेची भयावहता आणि रीतीने केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण परिसराला हादरवून टाकले आहे.