

Colombia Air Crash Disaster 110 Soldiers Killed Videos Reveal Impact
Esakal
दक्षिण अमेरिकन देश कोलंबियात हवाई दलाचं लॉकहीड सी १३० हर्क्युलस विमान कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या विमानातून ११० सैनिक प्रवास करत होते. त्या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर येत आहे. विमानाने उड्डाण करताच काही क्षणात ते कोसळलं. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. विमानाने पेट घेतला आणि काही स्फोट झाले. यामुळे धुराचे लोट हवेत पसरले होते. आता अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.