4-Day Work Week : एक फेब्रुवारीपासून 'या' कंपन्यांमध्ये लागू होणार चार दिवसांचा कामाचा आठवडा; सुटीचाही मिळणार पगार!

employees to get three days paid week off : ब्लूमबर्गने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्व कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना पूर्वी आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळत होती. मात्र, आता त्यांना तीन दिवस सुट्टी मिळणार आहे.
4-Day Work Week
4-Day Work WeekeSakal

4-Days Working Week in Germany : सध्या कित्येक देशांमध्ये कामाचा आठवडा चार दिवसांचा करण्याचा ट्रेंड चालू आहे. आता जर्मनीमध्ये देखील कर्मचाऱ्यांना तीन दिवस सुट्टी देण्याचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. देशातील 45 कंपन्यांनी या प्रयोगाची तयारी दर्शवली असून, 1 फेब्रुवारी 2024 पासून याची अंमलबजावणी होणार आहे.

पगार मिळणार पूर्ण

ब्लूमबर्गने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्व कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना पूर्वी आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळत होती. मात्र, आता त्यांना तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही जादाची सुट्टीदेखील पगारी असणार आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार आणि जादा सुट्टी मिळणार आहे. (Three Days Paid Weekly Off)

कंपन्यांचा होणार डबल फायदा

सध्या जर्मनीमध्ये कंपन्यांना एका मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागत आहे. गेल्या वर्षी आलेल्या आर्थिक मंदीमुळे तेथील अर्थव्यवस्था आता हळू-हळू पूर्वपदावर येत आहे. मात्र यामुळे कित्येक कंपन्यांमध्ये कामगार उपलब्ध नसल्याचं म्हटलं जात आहे. चार दिवसांच्या वर्किंग वीकमुळे कामगारांची कमी भरुन निघणार आहे. सोबतच उपलब्ध कामगारांच्या कार्यक्षमतेत देखील वाढ होईल असा विश्वास या कंपन्यांनी व्यक्त केला आहे. (Germany Working Week)

4-Day Work Week
ChatGPT Data Collection : इशारा देऊनही 'चॅटजीपीटी' चोरतंय यूजर्सचा डेटा! इटलीची ओपन एआय अन् मायक्रोसॉफ्टला नोटीस

ब्रिटनमध्येही झालाय प्रयोग

यापूर्वी 2022 साली ब्रिटनमध्ये देखील अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. यानंतर कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढल्याचं दिसून आलं होतं. जगभरातील कित्येक कर्मचारी संघटना या कामगारांवरील कामाचा ताण आणि दबाव कमी करण्याची मागणी करत असतात. यामुळेच अशा प्रकारचे प्रयोग अधिक प्रमाणात होण्याची मागणी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com