esakal | भारतात लॉकडाउनचे परिणाम भयंकर असतील; WHO चा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

soumya swaminathan

भारत कोरोनाच्या दुसरी लाटेचा सामना करीत आहे. ही लाट अधिक तीव्र असल्याने अनेक राज्यांनी शनिवार - रविवारी लॉकडाउन, रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

भारतात लॉकडाउनचे परिणाम भयंकर असतील; WHO चा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारत कोरोनाच्या दुसरी लाटेचा सामना करीत आहे. ही लाट अधिक तीव्र असल्याने अनेक राज्यांनी शनिवार - रविवारी लॉकडाउन, रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाउन करण्याचाही विचार सुरू आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ सौम्‍या स्वामीनाथन यांनी लॉकडाउनचे परिणाम भयंकर असतील, असा इशारा दिला आहे. तसेच कोरोनाची ही लाट नियंत्रित करण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. लसीकरणासंदर्भातही त्यांनी भूमिका मांडली.

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी विचार करण्यापूर्वी आणि पुरेशा प्रमाणात लसीकरण होण्यापर्यंत आपल्याला दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. कोरोना व्हायरसच्या साथीच्या अनेक लाटा येऊ शकतात. कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोस देण्यात ८ ते १२ आठवड्यांचे अंतर ठेवण्याची शिफारस ‘डब्ल्यूएचओ’ने केली आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या की लहान मुलांना लस देण्याचा सल्ला ‘डब्ल्यूएचओ’ने दिलेला नाही. मात्र दोन डोसमधील अंतर ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढविता येऊ शकते.

हे वाचा - ब्रिटनमध्ये एस्ट्राझेनेका लसीची लहानग्यांवरील ट्रायल थांबवली; रक्तात गुठळ्यांची तक्रार

भारतात लसीकरणाचे वेग चांगला
‘डब्ल्यूएचओ’च्या प्रादेशिक संचालिका पूनम खेत्रीपाल यांनीही लसीकरणावर भर दिला. आजच्या जागतिक आरोग्य दिवसानिमित्त त्या बोलत होत्या. कोरोना संसर्गाची नवी लाट जगभरात पसरली आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. विशेष बाब म्हणजे भारतात लशीचे दररोज सुमारे २६ लाख डोस दिले जात आहेत. यात अमेरिका खालोखाल भारताचा क्रमांक आहे. अमेरिकेत दररोज साधारण ३० लाख डोस देण्यात येत आहेत.

हेही वाचा - '15 एप्रिलपर्यंत भारतात 50 हजार मृत्यू?' WHO चं स्पष्टीकरण; वाचा व्हिडिओमागील सत्य

देशात रुग्णवाढीचा रेकॉर्ड
देशात गेल्या 24 तासांत 1.15 लाखहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर कार 630 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 1 लाख 15 हजार 736 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 28 लाख 1 हजार 785 वर पोहोचला आहे. सध्या देशात 8 लाख 43 हजार 473  रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. तर 8 कोटी 70 लाख 77 हजार 474 जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. 

loading image