esakal | Congo : नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटून 51 जणांना जलसमाधी; 69 जण बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

Congo river
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये बोट उलटल्याने 100 हून अधिक लोक बेपत्ता झालेत.

नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटून 51 जणांना जलसमाधी; 69 जण बेपत्ता

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये (Democratic Republic of Congo) बोट उलटल्याने 100 हून अधिक लोक ठार अथवा बेपत्ता झालेत, याबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही. प्रांतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ही घटना कांगो नदीत (Congo river) घडलीय. यामुळं बोटीवरील 100 हून अधिक लोक ठार किंवा बेपत्ता झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना उत्तर-पश्चिम प्रांताच्या मोंगालाचे (Mongala) प्रवक्ते नेस्टर मॅगबाडो (Nestor Magbado) म्हणाले, सध्या नदीपात्रातून 51 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून बोटीवरील अन्य 69 जण अद्याप बेपत्ता आहेत. या अपघातात 39 लोक वाचले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: 14 वर्षापूर्वी ज्यानं वाचवलं, त्याच्याच कुशीत गोरिलानं सोडला अखेरचा श्वास

यापूर्वी कांगोमध्ये 15 फेब्रुवारी रोजी एक बोट पलटी झाल्याने 60 जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघातही कांगो नदीतच घडला होता. बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोक होते, यामुळे बोट बुडाली. देशाचे मंत्री स्टीव्ह मबिकायी यांनी सांगितलं, की या बोटीवर 700 लोक होते. ही घटना देशातील माई-नोमडबे (Mai-Ndombe) प्रांतात घडली. ही बोट किनहासा प्रांतातून एक दिवस आधी मबनडाकासाठी निघाली होती. बोट माई-नोमडबे प्रांतातील लोंगगोला इकोती गावाजवळ पोहोचली, तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली आणि बोट बुडाली.

हेही वाचा: जगातील 'या' देशांत शिक्षकांना मिळतो सर्वाधिक 'पगार'

जानेवारीतही बोटीचा अपघात

बोट बुडण्याचं खरं कारण क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं. त्यावर अधिक वजनही चढवण्यात आलं, जे अपघाताचं कारण ठरलं. मबिकायी यांनी या घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केलीय. तसेच या घटनेतील जबाबदारांवर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी कुटुंबीयांना आश्वासन दिलंय. यापूर्वीही कांगोमध्ये अशा घटना समोर आल्या आहेत. जानेवारीत देखील एका बोटीचा अपघात झाला होता, ज्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 20 लोक बेपत्ता झाले होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्यामुळे हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितलंय.

loading image
go to top