esakal | डोनाल्ड ट्रम्प यांनी वंशद्वेषी व्हिडिओ ट्विट केल्याने वाद
sakal

बोलून बातमी शोधा

Donald-Trump

उपाध्यक्ष पेन्स चळवळीविरोधात
ट्रम्प हे वादग्रस्त ट्विटवरून टीका सहन करत असतानाच उपाध्यक्ष माइक पेन्स यांनीही आपण ‘ब्लॅक लाइव्हज्‌ मॅटर’ या चळवळीच्याविरोधात असल्याचे म्हटले आहे. मी वंशद्वेषाच्या विरोधातच असून जॉर्ज फ्लॉइड यांचा मृत्यू खेदजनक आहे, असे पेन्स यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी वंशद्वेषी व्हिडिओ ट्विट केल्याने वाद

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन - ‘व्हाइट पॉवर’ अशी घोषणा देणाऱ्या एका समर्थकाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाद ओढवून घेतला. ट्रम्प यांनी नंतर तो व्हिडिओ काढून टाकला. या व्हिडिओमधील घोषणा ट्रम्प यांनी ऐकल्या नव्हत्या, अशी सारवासारव ‘व्हाइट हाउस’ने नंतर केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर ‘ब्लॅक लाइव्हज्‌ मॅटर’ ही चळवळ सध्या जोरात आहे. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार असून, ट्रम्प हे दुसऱ्यांदा रिंगणात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर विरोधकांबरोबरच जनतेकडूनही मोठी टीका होत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये ट्रम्प समर्थक आणि विरोधकांमध्ये घोषणाबाजी होत असल्याचे दिसत होते. त्यातच काही पाठीराखे ‘व्हाइट पॉवर’च्या घोषणा देत होते.

लोकसंख्या घटविण्यासाठी बळजबरीने नसबंदी, अटकसत्र