esakal | जगभरात कोरोना बळींची संख्या ४० लाखांवर; ‘डेल्टा’चा प्रसार वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

जगभरात कोरोना बळींची संख्या ४० लाखांवर; ‘डेल्टा’चा प्रसार वाढला

जगभरात कोरोना बळींची संख्या ४० लाखांवर; ‘डेल्टा’चा प्रसार वाढला

sakal_logo
By
विनायक होगाडे

वॉशिंग्टन : कोरोनाच्या डेल्टा या सर्वाधिक संसर्गक्षम असलेल्या प्रकाराचा प्रसार वाढत असतानाच कोरोना संसर्गामुळे जगभरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४० लाखांच्या वर गेली असल्याचे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने सांगितले आहे. जवळपास प्रत्येक देशात नोंद झालेल्या मृत्युसंख्येपेक्षाही प्रत्यक्षातील मृत्युसंख्या अधिक असल्याचा दावा केला जात आहे. दीड वर्षांहून अधिक काळापासून जगाला वेठीस धरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग नजीकच्या काळात पूर्णपणे आटोक्यात येण्याची चिन्हे अद्याप तरी नाहीत. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याचे आणि लस घेण्याचे आवाहन आरोग्य संघटनांनी केले आहे.

हेही वाचा: फेसबुकवरील कंटेटमुळे ध्रुवीकरण शक्य : सर्वोच्च न्यायालय

अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. त्याचा परिणाम म्हणून दररोज मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जानेवारीतील १८ हजारांवरून आता ७९०० पर्यंत खाली आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये डेल्टा हा कोरोना विषाणूचा उत्परिवर्तित प्रकार सर्वत्र वेगाने पसरत आहे. अमेरिका, भारत, ब्रिटन, इस्राईल या देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढते आहे. ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटविण्याची तयारी सुरु असतानाच जानेवारीपासून प्रथमच एकाच दिवशी ३० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. अनेक देशांनी पुन्हा निर्बंध कडक करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर राणे तुम्ही काय प्रतिक्रिया दिली ते जरा आठवा - अरविंद सावंत

कोरोना मृत्युसंख्येची तुलना

  • - १९८२ पासून जगभरात झालेल्या युद्धांमध्ये बळी पडलेल्यांच्या एकत्रित संख्येइतकी

  • - दर वर्षी अपघातांमध्ये जगभरात मृत्युमुखी पडणाऱ्यांपेक्षा तिप्पट

  • - जॉर्जिया देशाच्या लोकसंख्येइतकी

सर्वाधिक कोरोनामृत्यू असलेले देश

  • अमेरिका : ६,२१,९०४

  • ब्राझील : ५,२८,६११

  • भारत : ४,०५,०५७

  • मेक्सिको : २,३४,१९४

  • पेरु : १,९३,७४३

loading image