कोरोनामुळे चीनमध्ये बिकट स्थिती; क्वारंटाईन केंद्रात ना जागा, लोक घरात बंद

कडक निर्बंधांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. लोकांना ना खाण्या-पिण्याच्या वस्तू मिळतायत, ना औषधे.
China Corona News
China Corona Newsesakal

बीजिंग : चीनची आर्थिक राजधानी शांघायमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालत आहे. गुरुवारी येथे कोरोनाची रुग्णसंख्या २७ हजारांपेक्षा अधिक नोंदवली गेली. मात्र २५ हजारांपेक्षा जास्त संक्रमित रुग्णांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत. शांघायमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे प्रकरणे समोर येत आहेत. कोरोनामुळे शांघायची स्थिती वाईट झाली आहे. चीनच्या झिरो कोविड पाॅलिसी अंतर्गत येथे कडक लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. शांघायची २.५ कोटी लोकसंख्या घरांमध्ये कैद आहे. कडक लाॅकडाऊन असूनही येथे कोरोनाची (Corona) रुग्णसंख्या कमी होताना दिसेना. शांघायमध्ये कोरोनाचे प्रकरणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागे ओमिक्राॅन (Omicron) असल्याचे मानले जात आहे. (Corona Fastly Spreads In China, Zero Covid Police Affect Peoples Lives In Shanghai)

China Corona News
'मनसेने भोंगे लावल्यास त्यावरुन वाढत्या महागाईविषयी जनतेला माहिती द्यावी'

क्वारंटाईन केंद्रांमध्ये प्रचंड गर्दी

कोरोनामुळे शांघायची स्थिती वाईट झाली आहे. येथे संक्रमित रुग्णांना ठेवण्यास जागा उरलेली नाही. शाळा आणि कार्यालयांची इमारतींना क्वारंटाईन केंद्रात बदलले जात आहे. वृत्तसंस्थेनुसार, क्वारंटाईन केंद्रांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. येथे दोन खाटांमध्ये एक हाताचे अंतरही नाही. शांघायच्या एका क्वारंटाईन केंद्रात राहत असलेल्या ६० वर्षाच्या वयस्कर महिलेने वृत्तसंस्थेला एक व्हिडिओ पाठवला आहे. यात तिने दावा केला की केंद्रात प्रचंड गर्दी आहे. लोकांमध्ये एक मीटरचे अंतरही नाही. केंद्रात मुलांसह २०० लोक राहत आहेत, असा दावा महिलेने केला आहे. येथे अंघोळीसाठी ही व्यवस्था नाही. फक्त ४ शौचालये आहेत. नाष्ट्यात फक्त ब्रेड मिळत आहे, असे महिलेने सांगितले. चीनच्या (China) झिरो कोविड धोरणाअंतर्गत, पाॅझिटिव्ह अहवाल आल्यानंतर क्वारंटाईन केंद्रात राहणे जरुरीचे आहे. दोन वेळेस कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच क्वारंटाईन केंद्रातून रुग्णाला सोडले जात आहे.

China Corona News
चीन आणखी एका पृथ्वीचा घेणार शोध; 'Earth 2.0' प्लॅन तयार

रहिवाशी इमारतींमध्ये केंद्र बनवण्यास विरोध

शांघाईत मार्चपासून आतापर्यंत कोरोनाचे २.८० लाखांपेक्षा अधिक प्रकरणे समोर आली आहेत. संक्रमितांची संख्या सतत वाढत आहे. या कारणामुळे आता लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे आता रहिवाशी इमारतींना क्वारंटाईन केंद्रात बदलवले जात आहे. संक्रमितांना येथे ठेवले जात आहे. मात्र त्यास विरोध सुरु झाला आहे.

ना खाण्याचे साहित्य, ना औषधे मिळतायत

शांघायमध्ये कडक निर्बंधांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. लोकांना ना खाण्या-पिण्याच्या वस्तू मिळतायत, ना औषधे. लोक घरांमध्ये बंद आहेत. त्यांना बाहेर येऊ दिले जात नाही. लोक सोशल मीडियावर तक्रार करित आहेत, की त्यांना पाण्या-पिण्याच्या वस्तूंची टंचाई जाणवत आहे. तसेच लोकांना औषधेही मिळत नाही. शांघायमध्ये राहणारे ग्रेप चेन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की त्यांचे वडील नुकतेच्या आलेल्या स्ट्रोकमधून बाहेर येत आहेत. ते त्यांच्यासाठी औषधे घेण्यासाठीही जायला घाबरत आहेत.

China Corona News
युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम! भारतात TV च्या किंमती वाढणार

शांघायमध्ये सर्व कामकाज ठप्प

झिरो कोविड पाॅलिसीमुळे शांघाईतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. शांघायच्या शुझोऊ शहरात १.८ कोटी लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. येथे स्मार्टफोन उत्पादनाचे सर्वात मोठे काम होते. संशोधन संस्था गेव्हेकल ड्रेगोनाॅमिक्सनुसार, जीडीपीनुसार चीनचे १०० मोठ्या शहरांपैकी ८७ मध्ये कोणत्याना कोणत्या प्रकारचे निर्बंध लागू आहेत. यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com