कोरोनाचा नवीन व्हेरियंट 'XE' ची संक्रमणक्षमता सर्वाधिक; WHO चा इशारा

Corona New Variant XE
Corona New Variant XE esakal

कोरोनाचा आणखी एन नवा व्हेरियंट (Corona New Variant) आढळून आला आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गंभीर इशारा दिला आहे. एक्सई (XE) असे या व्हेरियंटचे नाव असून हा व्हेरियंटची संक्रमणक्षमता (Corona New Variant More Transmissible ) ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंटपेक्षा १० टक्क्याने अधिक आहे, असं WHO कडून सांगण्यात आलं आहे.

Corona New Variant XE
'आता मिरवणुका जोरात काढा'; महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध गुढीपाडव्यापासून हटणार

आतापर्यंत ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट BA.2 सर्वाधिक संसर्गजन्य होता. पण, आता त्यापेक्षाही घातक व्हेरियंट समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या नवीन व्हेरियंटमुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काय आहे XE व्हेरियंट? -

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे दोन व्हेरियंट BA.1 आणि BA.2.चे मिश्रण आहे. या दोन व्हेरियंटपासून XE चे म्युटंट तयार झाले आहे. सध्या या नव्या व्हेरियंटचे रुग्ण कमी आहेत. हा व्हेरियंट पहिल्यांदा ब्रिटनमध्ये आढळून आला असून आतापर्यंत ६०० रुग्ण आढळून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. प्राथमिक अभ्यानुसार, हा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंटपेक्षा १० टक्के जास्त पटीने संक्रमित होत असल्याचं आढळून आलं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

दरम्यान, भारतातील अनेक राज्यांमध्ये निर्बंध उठविण्यात आले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात १ एप्रिलपासून निर्बंध उठविण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मास्क घालणे ऐच्छिक करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ दिल्ली आणि इतर राज्यांनी देखील निर्बंध हटवले. पण, आता नवीन व्हेरियंटमुळे कोरोना वाढणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com