एकमेकांना किस करू नका; अन्यथा...

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 मार्च 2020

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत असल्याने किस करण्याबरोबरच हस्तांदोलन करण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय इटली सरकारने घेतला आहे. त्यामुळे या देशामध्ये आता किस व हस्तांदोलनावर बंदी आली आहे.

रोम (इटली): जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत असल्याने किस करण्याबरोबरच हस्तांदोलन करण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय इटली सरकारने घेतला आहे. त्यामुळे या देशामध्ये आता किस व हस्तांदोलनावर बंदी आली आहे.

इटलीसह फ्रान्स सरकारनेही आपल्या देशातील नागरिकांना गालावर किस न करण्याच्या सुचना दिल्या आहेत. फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हिअर वेअर यांनी यासंदर्भातील सुचना दिल्या आहेत. हे निर्बंध तात्पुरत्या कालावधीसाठी असल्याचंही त्यांनी सांगितलं. फ्रान्समध्ये एकमेकांना भेटल्यावर गालावर किस करण्याची प्रथा आहे. परंतु, करोनामुळे सरकारने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध देश वेगवेगळे निर्बंध घालू लागले आहेत. इटलीच्या सरकारनेही नवा आदेश जारी केला आहे.

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारचे आपत्कालीन नियोजन

करोनाच्या पार्श्वभूमीवर इटलीमधील सर्व फुटबॉलचे सामने रद्द करण्यात आले आहेत. म्युझिक कॉन्सर्टही अनिश्चित कालावधीसाठी रद्द करण्यात आले आहेत. शिवाय, सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यावरही सरकार विचार करत आहे, असे इटलीचे शिक्षण मंत्री ल्युसिया एंजोलिना यांनी सांगितले. दरम्यान, करोनामुळे जगभरात ३ हजारांपेक्षा अधिक लोकांचे प्राण गमवावे लागले असून, ९५ हजारांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

कोरोनामुळं गुगल-ट्विटरनं कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

चीनमधील वुहान शहरातून या व्हायरसचा प्रसार झाला आहे. चीनमध्ये 3 हजारांच्या आसपास नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर इटलीमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. इटलीत पोप फ्रान्सिस यांनाही सर्दी-ताप असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. चीननंतर दक्षिण कोरिया, जपान, इटली आणि इराण या देशांतील नागरिकांवर सर्वांचे लक्ष आहे. भारतातही या रोगाचे रुग्ण सापडले आहेत.

भारतात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण; रुग्णांची संख्या...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus italy frans bans kissing each other government orders