esakal | कोरोनामुळं गुगल-ट्विटरनं कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

बोलून बातमी शोधा

Google-Twitter

कोरोनाग्रस्त आशियाई देश असलेल्या हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियातील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोनामुळं गुगल-ट्विटरनं कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!
sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सोशल मीडिया क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्या गुगल आणि ट्विटरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) परवानगी दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

ट्विटरने सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यालयातील ५ हजार कर्मचाऱ्यांना तर गुगलने डब्लिन येथील युरोपियन मुख्यालयातील  ८ हजार कर्मचाऱ्यांना या नियमाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. गुगलचे युरोपियन मुख्यालय आयर्लंडमध्ये आहे. हे मुख्यालय सिलिकॉन डॉक्स म्हणून ओळखले जाते. लोकांची कायम वर्दळ असलेले हे ऑफिस बुधवारी ओस पडले होते.

- Coronavirus : कोरोनाच्या धसक्याने कारागृह केले रिकामे; 54 हजार कैद्यांना दिले सोडून!

एका कर्मचाऱ्याला तापाची लक्षणे दिसून आल्याने पूर्ण ऑफिसमध्येच कोरोना आल्याची अफवा पसरली होती. परंतु त्या कर्मचाऱ्याला कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही खबरदारी म्हणून कंपनीने पुढील सूचना येईपर्यंत कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. ऑफिस मीटिंग या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेतल्या केल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे. 

- निर्भया खटला : दोषींना फाशीचा मार्ग मोकळा; कायद्यातील पळवाटा संपल्या?

आशियात खळबळ उडवून दिल्यानंतर कोरोनाने आपला मोर्चा युरोपीय देशांकडे वळवला आहे. त्यामुळे गुगल आणि ट्विटरने अनिश्चित काळासाठी हा निर्णय घेतला आहे. स्वत: सक्षम असल्यास आणि अत्यावश्यक वेळीच घराच्या बाहेर पडावे, अशा प्रकारची सूचना कंपनीतर्फे देण्यात आली आहे. 

कोरोनाग्रस्त आशियाई देश असलेल्या हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियातील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच नियोजित बैठकाही रद्द करण्यात आल्या आहेत.

- Coronavirus : भारतात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण; रुग्णांची संख्या...

दुसरीकडे, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म कॉइनबेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन आर्मस्ट्राँग यांनीही अशीच घोषणा केली. ''आम्ही कर्मचार्‍यांना हा पूर्ण आठवडा घरी बसून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरून काम करणे हा कोरोना रोखण्याचा एकमेव पर्याय नाही. मात्र, कोरोना आणखी पसरू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.'' असे त्यांनी ट्विट केले.